शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाईटातून चांगलं; कोरोनाचं संकट भारताला फळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 08:37 IST

कोरोना विषाणूच्या संसर्गाचे लोण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्याने जागतिक बाजारपेठेची घडी विस्कटत असताना या विषाणूंचा उगम जेथून झाला त्या चीनच्या अर्थव्यवस्थेला याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

नवी दिल्ली : अत्यंत घातक अशा कोरोना विषाणूच्या संसर्गाचे लोण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्याने जागतिक बाजारपेठेची घडी विस्कटत असताना या विषाणूंचा उगम जेथून झाला त्या चीनच्या अर्थव्यवस्थेला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अशा स्थितीत चीनच्या अडचणींमुळे खासकरून निर्यात व्यापारात रिकामी झालेली जागा घेण्याची भारतास संधी आहे. देशाच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला हवी तशी गती येत नसताना ही संधी साधता आली तर कोरोनाचे संकट भारताच्या दृष्टीने इष्टापत्तीही ठरू शकेल, अशी आशा व्यापार-उद्योग क्षेत्राच्या ‘असोचेम’ या शीर्षस्थ संघटनेने व्यक्त केली आहे.इलेक्ट्रॉनिक्स, औषधी, विशेषत: रासायनिक आणि वाहन क्षेत्रासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी भारत मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून आहे. कोरोना विषाणूंच्या प्रकोपामुळे उद्योगांच्या या क्षेत्रांना कच्च्या मालाच्या पुरवठ्याचा तुटवडा भेडसावत आहे; परंतु, याखेरीज कोरोनामुळे स्थानिक व्यावसायिकांसाठी संधीची दारे खुली झालेली इतरही अनेक क्षेत्रे आहेत. काही क्षेत्रे सोडल्यास भारत बºयाच प्रमाणात अभियांत्रिकी निर्यात बाजारातील चीनची रिकामी जागा घेऊ शकतो. चामडे व चामड्याच्या वस्तू या क्षेत्रातही अशीच स्थिती आहे, असे ‘असोचेम’चे सरचिटणीस दीपक सूद यांनी सांगितले. चीनमधील निर्यातदार पुरवठा सुरळीत करेपर्यंत भारताला अनेक क्षेत्रांत स्पर्धकांपेक्षा आपली उत्पादने अधिक दर्जेदार करावी लागतील. भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेने चीनमुळे रिकामी होणारी बाजारातील रिकाम्या जागेची उणीव भरून काढणे जरुरी आहे, असेही सूद म्हणाले.चीनचे उत्पादन निच्चांकी पातळीवर...चीनमधील कारखानदारी क्षेत्रातील उत्पादन जवळपास ठप्पच पडले आहे. क्रय व्यवस्थापन निर्देशांकानुसार फेब्रुवारी महिन्यात चीनच्या कारखानदारी क्षेत्रातील उत्पादन वीस वर्षांतील नीचांक पातळीवर आले आहे. परिणामी जागतिक बाजारावर याचे गंभीर परिणाम होणे स्वाभाविक आहे. अशात पुढच्या काही महिन्यांत भारतीय निर्यातदारांना जागतिक बाजारात मोठी संधी मिळू शकते, असे असोचेमने म्हटले आहे.