शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमध्ये मुलींच्या वसतिगृहात कोरोना स्फोट, 19 जण संक्रमित; दिल्ली-महाराष्ट्रचं टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 01:43 IST

दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी तर छत्तीसगडमधील मुलींच्या वसतिगृहात एकाचवेळी तब्बल 19 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.

देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 3,641 रुग्ण आढळले आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी तर छत्तीसगडमधील मुलींच्या वसतिगृहात एकाचवेळी तब्बल 19 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.

मुलींच्या वसतिगृहात कोरोना स्फोट -माध्यमांतील वृत्तांनुसार, संबंधित वसतिगृहात एकाच वेळी 11 विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर आणखी काही विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली. यात आणखी 8 मुलींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर एकूण आकडा 19 वर पोहोचला आहे. यानंतर सर्वच विद्यार्थिनींना वसतिगृहातच क्वारंटाइन करण्यात आले आहे. याच बरोबर, संक्रमित विद्यार्थिनींच्या संपर्कात आलेल्या इतर विद्यार्थिनींची मुलींच्या वसतिगृहात तपासणी केली जात आहे.

दिल्लीत, महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत वाढ -एकीकडे छत्तीसगडमध्ये कोरोना स्फोट झाला असतानाच, दुसरीकडे दिल्लीतही कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासांत 293 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर दोन जणांचा मृत्यूही झाला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, सध्या दिल्लीत संसर्गाचा दर 18 टक्क्यांच्याही पुढे गेला आहे. येथे 15 दिवसांत नव्या रुग्ण संख्येत 6 पट वाढ झाली आहे. तसेच रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या 12 पटीने वाढली आहे. याशिवाय, महाराष्ट्रातही कोरोनाचा वेग वाढला आहे. येथे गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 248 रुग्ण समोर आले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस