शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनातही 7.3 टक्के वेतनवाढीचा अंदाज, ८७ टक्के कंपन्यांची पगारवाढीची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 06:44 IST

payment : व्यावसायिक सेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी  ‘एओन’ने केलेल्या सर्वेक्षणात काही सकारात्मक मुद्दे मांडले आहे.

नवी दिल्ली : कोरोना महामारीने लाखो लोकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आणले. त्यात काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. नोकरदार वर्गाला यावर्षी ६.१ टक्के वेतनवाढ मिळाली, तर २०२१ मध्ये सरासरी ७.३ टक्के वेतनवाढ मिळण्याचा अंदाज आहे.व्यावसायिक सेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी  ‘एओन’ने केलेल्या सर्वेक्षणात काही सकारात्मक मुद्दे मांडले आहे. कंपनीच्या अहवालानुसार कोरोनाच्या संकट काळातही देशातील अनेक कंपन्यांनी लवचिकता दाखविली आहे. सुमारे ७१ टक्के कंपन्यांनी २०२० मध्ये वेतनवाढ दिली होती. परंतु, २०२१ मध्ये यापेक्षा अधिक, म्हणजे ८७ टक्के कंपन्यांनी वेतनवाढ देण्याची तयारी दर्शविली आहे. भारतात यावर्षी सरासरी ६.१ टक्के वेतनवाढ राहिली आहे. गेल्या दशकातील ही नीचांकी वेतनवाढ राहिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील वर्षी सरासरी ७.३ टक्के वाढ मिळू शकते. २००९मध्ये आलेल्या जागतिक मंदीच्या काळात सरासरी ६.३ टक्के वेतनवाढ मिळाली होती. कंपन्यांनी आपले कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये गुंतवणूक केली आहे. कोरोना संकटातही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांप्रति परिपक्वता दाखवल्याचे ‘एओन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन सेठी यांनी म्हटले आहे.

असे केले सर्वेक्षण- २० औद्योगिक क्षेत्र- १०५० कंपन्यांचा समावेश- ७१ टक्के कंपन्यांनी दिली वेतनवाढ- ४५ टक्के कंपन्यांकडून ५ ते १०% वेतनवाढ

टॅग्स :businessव्यवसाय