शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कार्नेलिया सोराबजींचे केले गुगलने स्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 22:39 IST

देशाच्या पहिल्या वकील आणि ब्रिटनमधील भारताच्या पहिल्या महिला विद्यार्थी कॉर्नेलिया सोराबजी यांना सर्च इंजिन गुगलने बुधवारी खास चित्र (डुडल) काढून त्यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

ठळक मुद्देसोराबजी या अलाहाबाद उच्च न्यायालय वकील संघात जाणाºया पहिल्या महिला होत्या. त्यांनी पडदानशीन महिलांच्या हक्कांसाठी न थांबता लढा दिला. सामाजिक रुढी म्हणून त्याकाळी बुरख्यातील महिलांना त्यांच्या कुटुंबियांशिवाय इतरांच्या संपर्कात यायला मनाई होती.

नवी दिल्ली : देशाच्या पहिल्या वकील आणि ब्रिटनमधील भारताच्या पहिल्या महिला विद्यार्थी कॉर्नेलिया सोराबजी यांना सर्च इंजिन गुगलने बुधवारी खास चित्र (डुडल) काढून त्यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. सोराबजी यांचा जन्म १८६६ मध्ये महाराष्टातील नाशिक येथे झाला. त्या मुंबई विद्यापीठातील पहिल्या महिला पदवीधर होत्या. सोराबजी यांचे गुगलच्या होमपेजवरील चित्र जसज्योत सिंग हान्स यांनी काढलेले आहे. सोराबजी या चित्रात अलाहाबाद उच्च न्यायालयासमोर पांढºया विगमध्ये व वकिलाच्या काळ््या डगल्यात दिसतात.सोराबजी या अलाहाबाद उच्च न्यायालय वकील संघात जाणाºया पहिल्या महिला होत्या. त्यांनी पडदानशीन महिलांच्या हक्कांसाठी न थांबता लढा दिला. सामाजिक रुढी म्हणून त्याकाळी बुरख्यातील महिलांना त्यांच्या कुटुंबियांशिवाय इतरांच्या संपर्कात यायला मनाई होती.‘सोराबजी यांच्या १५१ व्या जयंतीचे महत्व काय तर अनेक प्रकारची प्रतिकूल परिस्थिती असतानाही कॉर्नेलिया सोराबजी यांनी रुढींचे अडथळे फोडले व दाखवलेली चिकाटी’, असे गुगलच्या डुडल पेजवर म्हटले आहे. सोराजबी यांना वकिली व्यवसाय करण्यास बंदी घातल्यानंतर त्या पडदानशीनांसाठी सरकारच्या कायदा सल्लागार बनल्या. सोराबजी या १८९२ मध्ये आॅक्सफर्ड विद्यापीठात कायदा शिकल्या. तथापि, त्या दिवसांत त्यांना विद्यापीठाने पदवी दिली नाही. हा नियम ३० वर्षांनंतर म्हणजे १९२२ मध्ये बदलला. परंतु पदवी न मिळाल्यामुळे त्यांना इंग्लडमध्ये वकिली करता आली नाही. त्या १८९४ मध्ये भारतात परतल्या परंतु १९२० पर्यंत त्यांना वकिली करण्यास परवानगी दिली गेली नव्हती.