शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कोराेना महामारीवर वेगाने विजय मिळवता येईल -पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 07:08 IST

“जी २० देशांच्या नेत्यांशी झालेली चर्चा खूप फलदायी होती. मोठ्या अर्थव्यवस्थेच्या देशांनी समन्वयाने काम केल्यास कोरोना महामारीतून वेगाने बाहेर पडता येईल.

नवी दिल्ली : जगातील मोठ्या अर्थव्यवस्थेच्या देशांतील समन्वयाच्या कामाने कोरोना महामारीवर वेगाने व खात्रीने विजय मिळवता येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. जी २० देशांच्या १५ व्या शिखर परिषदेला शनिवारी मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहिले त्यावेळी ते बोलत होते. परिषदेचे अध्यक्षस्थान सौदी अरेबियाकडे होते. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आदी नेते कोरोना महामारीने घडवलेल्या जागतिक परिणामाची चर्चा करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते. 

“जी २० देशांच्या नेत्यांशी झालेली चर्चा खूप फलदायी होती. मोठ्या अर्थव्यवस्थेच्या देशांनी समन्वयाने काम केल्यास कोरोना महामारीतून वेगाने बाहेर पडता येईल. व्हर्चुअल शिखर परिषद आयोजित केल्याबद्दल सौदी अरेबियाचे आभार,” असे मोदी यांनी ट्वीटवर म्हटले. मोदी यांनी मानवाच्या इतिहासाला कोरोना महामारीने महत्वाचे वळण दिले अशा शब्दांत वर्णन करून म्हटले की, दुसऱ्या महायुद्धानंतर जग सर्वात मोठ्या आव्हानाला तोंड देत आहे.

४१ लाख ग्रामस्थांसाठी ‘हर घर नल योजना’वाराणसी (उत्तर प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विंध्य प्रांतातील सोनभद्र आणि मिझार्पूर जिल्ह्यासाठी ‘हर घर नल योजना’ रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुरू करण्यात आली. यावेळी सोनभद्रमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. सोनभद्र आणि मिर्झापूर जिल्ह्यातील ४१ लाख ग्रामस्थांना या योजनेद्वारे पाणी दिले जाईल. यासाठी ५,५५५.३८ कोटी खर्च येणार आहे. विंध्याचल प्रांत हा नैसर्गिक स्रोतांनी विपूल असला तरी त्याकडे स्वातंत्र्य मिळाल्यापासून दुर्लक्ष् केले गेले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या