शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

ब्ल्यूटुथ जोडलेल्या चप्पलांद्वारे काॅपी, तीन परीक्षार्थींसह पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 10:51 IST

राजस्थान शिक्षक पात्रता परीक्षेतील प्रकार : मुख्य आरोपी फरार

ठळक मुद्देराजस्थान शिक्षक पात्रता परीक्षेतील प्रकार : मुख्य आरोपी फरार

जयपूर/बिकानेर :   अत्यंत चोख सुरक्षा व्यवस्थेत रविवारी राजस्थानमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा (रीट-२०२१) पार पडली. चप्पलेत ब्ल्यूटुथ उपकरण जोडून परीक्षेत नक्कल (कॉपी) करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी  तीन परीक्षार्थींसह पाचजणांना बिकानेरमधून अटक करण्यात आली आहे.

राजस्थान माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने आयोजित रीट परीक्षेसाठी राज्यभरातील सर्व ३३ जिल्ह्यांमध्ये ३,९९३ परीक्षा केंद्र स्थापन करण्यात आली होती.  दोन सत्रात घेण्यात आलेल्या या परीक्षेला १६ लाख ५१ हजार उमेदवार बसले होते.परीक्षेत उमेदवारांना कोणत्याही प्रकारे नक्कल करता येऊ नये म्हणून खबरदारीचे उपाय करण्यात आले होते.  रविवारी जयपूरसह अनेक जिल्ह्यांतील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

या परीक्षेत कॉपी करण्यासाठी ब्ल्यूटुथ उपकरण जोडलेल्या चप्पला घातल्याचे आढळल्यानंतर पाचजणांना  बिकानेरमध्ये अटक करण्यात आली. रीट परीक्षेशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी विविध ठिकाणांहून अन्य सातजणांना अटक करण्यात आली आहे.

बिकानेरचे पोलीस अधीक्षक प्रीती चंद्रा यांनी सांगितले की,  अटक करण्यात आलेल्यांपैकी दोघांची नावे मदन लाल आणि त्रिलोकचंद असून, ब्ल्यूटुथ उपकरण जोडलेल्या चप्पला परीक्षार्थी किंवा त्यांच्या नातेवाईकांना उपलब्ध करुन देणाऱ्या टोळीचे ते सदस्य आहेत. अन्य तीन परीक्षार्थी आहेत.

परीक्षेच्या आधी या  पाचजणांना गंगा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानकावर पकडण्यात आले. त्यांच्याकडून  ब्ल्यूटुथ उपकरण जोडलेल्या चप्पला आणि अन्य उपकरणे  जप्त करण्यात आली.  सहा लाख रुपयांत ब्ल्युटूथ उपकरण जोडलेल्या चप्पला परीक्षार्थींना विकण्यात आल्या होत्या.  या टोळीचा म्होरका असलेला मुख्य आरोपी  फरार असून, या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानexamपरीक्षाPoliceपोलिस