शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

'खाकी'तील बापमाणूस! झुडपात सापडली नवजात मुलगी; पोलीस अधिकारी घेणार दत्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2024 16:31 IST

मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून लोकांनी पाहिलं तेव्हा त्यांना मुलगी झुडपात पडलेली दिसली. घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण होतं.

दुर्गा अष्टमीच्या दिवशी गाझियाबादच्या बेव सिटी पोलीस स्टेशन हद्दीतील डासना येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोणीतरी एका नवजात मुलीला झुडपात सोडून निघून गेलं. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी चिमुकलीचा जीव वाचवला. कौतुकास्पद बाब म्हणजे पोलीस अधिकारी पुष्पेंद्र चौधरी यांनी मुलीला दत्तक घेण्याचा मोठा निर्णय घेतला. मुलीला आपल्या कुटुंबाचा भाग बनवण्यासाठी आवश्यक कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे.

डासना परिसरातील इनायतपूर गावाजवळील राजवाहेवळील झुडपात ही मुलगी आढळून आली. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून लोकांनी पाहिलं तेव्हा त्यांना मुलगी झुडपात पडलेली दिसली. घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण होतं. यानंतर स्थानिक पोलिसांना मुलगी झुडपात असल्याची माहिती देण्यात आले.  स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि नंतर मुलीचं चेकअप करण्यासाठी तिला डासना सीएससी येथे नेलं. पोलिसांनी मुलीच्या घरच्यांचा शोधही सुरू केला मात्र कोणीही सापडलं नाही.

मुलीला दत्तक घेण्याची कल्पना पोलीस अधिकारी पुष्पेंद्र सिंह यांच्या मनात आली. पुष्पेंद्र सिंह हे त्यांची पत्नी राशी यांच्याशी याबाबत बोलले, त्यानंतर त्यांच्या पत्नीने देखील मुलगी दत्तक घेण्यास होकार दिला. "नवरात्रीसारख्या पवित्र प्रसंगी मुलगी घरी आली तर ते खूप शुभ होईल आणि यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती असू शकते" असं त्यांच्या पत्नीने म्हटलं. पुष्पेंद्र यांनी २०१८ मध्ये लग्न केलं आहे. मात्र त्यांना मूल नाही. पण आता या चिमुकलीमुळे त्यांचं कुटुंब आनंदात आहे. 

या संपूर्ण प्रकरणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंकित चौहान यांनी सांगितलं की, ही मुलगी पोलिसांना झुडपात आढळून आली. पुष्पेंद्र आणि त्यांच्या कुटुंबीयांना मुलगी दत्तक घ्यायची आहे, त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुष्पेंद्र सिंह म्हणतात की, ते आणि त्यांची पत्नी राशी दोघेही या मुलीला दत्तक घेण्यास उत्सुक आहेत. मुलगी दत्तक घेण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ते मुलगी दत्तक घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. 

टॅग्स :Policeपोलिस