शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘काँग्रेस म्हणजेच मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजेच काँग्रेस’, रेवंत रेड्डीच्या विधानावरून वाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:12 IST

Revanth Reddy News: तेलंगाणामधील ज्युबिली हिल्स विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय पारा चढला आहे. यादरम्यान, जुबिली हिल्समधील काँग्रेसचे उमेदवार नवीन यादव यांच्या प्रचारासाठी आलेले मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केलेल्या एका विधानामुळे आता मोठा वाद पेटला आहे. ‘

तेलंगाणामधील ज्युबिली हिल्स विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय पारा चढला आहे. यादरम्यान, जुबिली हिल्समधील काँग्रेसचे उमेदवार नवीन यादव यांच्या प्रचारासाठी आलेले मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केलेल्या एका विधानामुळे आता मोठा वाद पेटला आहे. ‘काँग्रेसचा अर्थ आहे मुस्लिम आणि मुस्लिमांचा अर्थ आहे काँग्रेस’, असे विधान रेवंत रेड्डी यांनी केलं आहे. तसेच रेवंत रेड्डी यांच्या या विधानावर आता विरोधी पक्षातील भाजपाकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. मात्र रेवंत रेड्डी यांच्या या विधानामागे एक विचारपूर्वक आखलेली रणनीती असल्याचं म्हटलं जात आहे.

जुबिली हिल्स विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी एकूण ५८ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र येथे मुख्य लढत ही बीआरएसच्या उमेदवार मगंती सुनिता, काँग्रेसचे उमेदवार नवीन यादव आणि भाजपाचे उमेदवार लंकाला दीपक रेड्डी यांच्यात आहे. त्यातही ओवेसी यांच्या एमआयएमने काँग्रेस उमेदवार नवीन यादव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लिम मतांचं विभाजन झाल्यास त्याचा फायदा भाजपाला होऊ शकतो. त्यामुळे मुस्लिम मतांचं विभाजन टाळण्यासाठी प्रसंगावधान राखत रेवंत रेड्डी यांनी हे विधान केल्याचं बोललं जात आहे.

या विधानामधून तेलंगाणामध्ये मुस्लिमांना संधी देणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष  असल्याचं रेवंत रेड्डी यांना दाखवून द्यायचं होतं. जुबिली हिल्स विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. येथे सुमारे १.४ लाख मुस्लिम मतदार आहेत. त्यामुळे आपण मुस्लिमांचे सर्वात मोठे हितचिंतक असल्याचे दाखवून देण्यासाठी रेवंत रेड्डी यांनी हे विधान आहे. दरम्यान, रेवंड रेड्डी यांनी केलेल्या या वक्तव्यावर आता विरोधकांकडून जोरगार टीका केली जात आहे. रेवंत रेडींचं विधान हे व्होटबँकेचे राजकारण असल्याचा दावा भाजपाने केला आहे. तर बीआरएनेही या विधानावर टीका केली आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Revanth Reddy's statement 'Congress is Muslim' sparks controversy before by-election.

Web Summary : Telangana CM Revanth Reddy's statement linking Congress to Muslims ignited controversy ahead of Jubilee Hills by-election. BJP criticized the statement, alleging vote bank politics. The constituency has a significant Muslim voter base.
टॅग्स :Telanganaतेलंगणाcongressकाँग्रेसMuslimमुस्लीम