शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

"दिव्यांग डॉक्टरच्या शस्त्रक्रियेवर विश्वास ठेवाल का"; महिला IAS अधिकाऱ्याच्या प्रश्नाने नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 15:37 IST

पूजा खेडकर यांच्या प्रकरणामुळे दिव्यांग कोट्याची चर्चा होत असताना एका महिला अधिकाऱ्याने धक्कादायक विधान केलं आहे.

IAS Smita Sabharwal : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरण देशभरात गाजत असताना अनेक अधिकाऱ्यांची प्रकरणे चर्चेत आली आहेत. दिव्यांग असल्याचं खोट प्रमाणपत्र तसेच कोट्यवधींची संपत्ती असतानाही नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट मिळवून पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचा आरोप आहे. एकीकडे हे प्रकरण गाजत असताना आणखी एक महिला आयएएस अधिकारी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महिला अधिकाऱ्याने केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देखील करण्यात आली आहे.

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिव्यांगांसाठीच्या नियमांनुसार नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर तेलंगणाच्या वरिष्ठ अधिकारी स्मिता सभरवाल यांनी धक्कादायक विधान केलं आहे. स्मिता सभरवाल यांनी अखिल भारतीय सेवांमध्ये दिव्यांगांसाठी आरक्षणाच्या गरजेवर प्रश्न उपस्थित केला आहे. यावरुन आता शिवसेना (उबाठा) खासदार प्रियांका चतुर्वेदी, दिव्यांग हक्क कार्यकर्ते आणि इतरांनी त्यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे.

तेलंगणामधील वित्त आयोगाच्या सदस्या म्हणून कार्यरत असलेल्या स्मिता सभरवाल यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन उपस्थित केलेला हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. "सध्या या चर्चेला जोर मिळत असल्याने मी सर्व दिव्यांगांबद्दल संपूर्ण आदर बाळगत लिहीते आहे की, विमान कंपन्या अपंगत्व असलेल्यांना वैमानिक म्हणून नियुक्त करतात का? किंवा तुम्ही सुद्धा शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर दिव्यांग असेल तर त्यावर विश्वास ठेवाल का? अखिल भारतीय सेवांमध्ये (आयएसएस/पीआयएस/पीएफओएस) सारख्या सेवांमध्ये प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन, अनेक तास सतत काम करणं, लोकांच्या तक्रारी थेट त्यांच्याकडून ऐकून घेणं यासारखी कामं असतात. यासाठी शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक आहे.  त्यामुळे या अग्रगण्य सेवेसाठी या कोट्याची काय गरज आहे?," असं स्मिता सभरवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

स्मिता यांच्या या पोस्टवरुन ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी याला बहिष्कृत दृष्टिकोन म्हटलं आहे. “हा एक अतिशय दयनीय आणि अपमानजनक दृष्टीकोन आहे. नोकरशहा आपली मर्यादित विचारसरणी आणि विशेषाधिकार कसे दाखवतात हे पाहणे मजेशीर आहे," असे चतुर्वेदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

याप्रकरणी हैदराबादमधील इब्राहिमपट्टणम पोलीस ठाण्यामध्ये स्मिता सभरवाल यांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिव्यांग हक्क गटाच्या समितीचे प्रदेश अध्यक्ष कार्यकर्ते जंगय्या यांनी ही तक्रार दाखल केली आहे. 

टॅग्स :Telanganaतेलंगणाupscकेंद्रीय लोकसेवा आयोग