शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हॉर्न वाजवण्यावरून वाद? मंत्री बाबूल सुप्रियो आणि भाजपा खासदार भररस्त्यात आमने सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 13:35 IST

Babul Supriyo Vs Abhijit Ganguly: पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकात्यामध्ये शुक्रवारी रात्री चक्क मंत्री आणि आणि खासदारांमध्ये हॉन वाजवण्यावरून कडाक्याचं भांडण झाल्याचं दिसून आलं. ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील मंत्री बाबूल सुप्रियो आणि भाजपा खासदार अभिजित गांगुली यांच्यात हा वाद झाला.

रस्त्याने प्रवास करत असताना वाहन चालकांमध्ये वाद तुम्ही अनेकदा पाहिले असतील. बऱ्याचदा हॉर्न वाजवण्यापासून ते किरकोळ अपघातांपर्यंत अनेक कारणांमुळे रस्त्यात तुफान भांडणं होतात. त्याचे व्हिडीओही व्हायरल होतात. मात्र पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकात्यामध्ये शुक्रवारी रात्री चक्क मंत्री आणि आणि खासदारांमध्ये हॉन वाजवण्यावरून कडाक्याचं भांडण झाल्याचं दिसून आलं. ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील मंत्री बाबूल सुप्रियो आणि भाजपा खासदार अभिजित गांगुली यांच्यात हा वाद झाला.

मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे १५ ते २० मिनिटांपर्यंत ही वादाववादी झाली. बाबुल सुप्रियो हे त्यांच्या कारमधून हावडा येथील निवासस्थानी जात होते. तर अभिजित गांगुली हे सुद्धा कोलकात्यामधून हावडा येथे जात होते. त्याचवेळी हॉर्न वाजवण्यावरून दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी वाद घातला. माझ्या कारला अडवण्यात आलं, तसेच माझ्यासोबत गैरवर्तन करण्यात आलं, असा आरोप बाबूल सुप्रियो यांनी केला आहे. तर बाबूल सुप्रियो यांनी माझी कार अडवली आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. बाबूल सुप्रियो हे हॉर्न वाजवण्याला विरोध करत होते, असा आरोप अभिजित गांगुली यांनी केला आहे.

दरम्यान, या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, अभिजित गांगुली यांच्या कारजवळ मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली दिसत आहे. तर पुलावर ही वादावादी सुरू असल्याचंही दिसत आहे. बाबूल सुप्रियो यांनी आरोप केला की, ‘’रात्री दहा वाजता माझ्या कारला शिविगाळ करत लक्ष्य करण्यात आलं. माझ्या गाडीवर आमदार असा उल्लेख कुठेही नाही. मात्र अभिजित गांगुली हे खासदार असा उल्लेख कारवर लिहून फिरत असतात’’, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, काही वेळाने पोलिसांनी तिथे येत हा वाद मिटवला.

बाबूल सुप्रियो यांनी या वादाबाबत आणखी माहिती देताना सांगितले की,’’मी स्वत:  माझी कार चालवत होतो. त्याचवेळी मागून एक कार जोराजोरात हॉर्न वाजवत आली. ती कार ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न करत होती’’. बाबूल सुप्रियो यांनी खाली उतरून पाहिले असता मागून आलेल्या कारवर खासदार, तामलुक असं लिहिलेलं होतं. त्यानंतर ते अभिजित गांगुल यांच्यासोबत बोलण्यासाठी गेले असता दोघांमध्ये वादावादी झाली. दरम्यान, खासदार अभिजित गांगुली यांच्याकडे बाबुल सुप्रियो यांच्यासोबत झालेल्या वादाची व्हिडीओ रेकॉर्डिंग असल्याचंही सांगण्यात येत आहे.  

 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालTrafficवाहतूक कोंडीBabul Supriyoबाबुल सुप्रियोAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपा