शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

योगींच्या 'मोदी की सेना' विधानानं वाद; माजी नौदल प्रमुखांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 18:39 IST

निवडणूक प्रचारात सैन्याचा गैरवापर होत असल्यानं अधिकारी नाराज

नवी दिल्ली: भारतीय लष्कराला मोदी की सेना म्हणणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. यातून त्यांनी सैन्याच्या दुरुपयोगाबद्दल चिंता बोलून दाखवली. निवडणूक प्रचारातील सैन्याचा दुरुपयोग रोखावा, अशी मागणी त्यांनी केली. आपल्या भूमिकेला सैन्य दलातील अनेक अधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याचंदेखील रामदास यांनी पत्रात नमूद केलं आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये सोमवारी एका जनसभेला संबोधित करताना भारतीय सैन्याचा उल्लेख 'मोदी की सेना' असा केला होता. याची दखल घेत निवडणूक आयोगानं अहवाल मागवला आहे. रामदास यांनी त्यांच्या पत्रात जैश-ए-मोहम्मदच्या विरोधात करण्यात आलेल्या एअर स्ट्रइकवरुन सुरू असलेल्या राजकारणाबद्दल चिंता व्यक्त केली. यामुळे मतदारांवर प्रभाव पडू शकतो, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये करण्यात आलेले हवाई हल्ले आणि त्यानंतर हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुरक्षित घरवापसीवरुन सुरू असलेल्या राजकारणाकडे रामदास यांनी निवडणूक आयोगाचं लक्ष वेधलं. काही पक्ष निवडणूक रॅली, माध्यमं, सार्वजनिक स्थळांवर नेत्यांच्या सोबतीनं सैन्याचे फोटो वापरुन आपला राजकीय अजेंडा राबवत आहेत, असं रामदास यांनी पत्रात म्हटलं आहे. 'अशा प्रकारची कृती पूर्णपणे चुकीची आहे. यामुळे सुरक्षा दलांच्या मूल्ल्यांवर घाला घातला जात आहे. या सर्व कृती भारतीय संविधानाच्या भावनेच्या विरोधात आहेत,' असंदेखील रामदास यांनी पत्रात म्हटलं आहे. निवडणूक आयोगानं तातडीनं या प्रकरणात लक्ष घालून प्रचारात सैन्याच्या फोटोंचा वापर रोखावा, असं आवाहन त्यांनी केलं. सैन्याच्या राजकीय वापरावरुन काँग्रेस, भाजपानं एकमेकांना लक्ष्य केलं आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगindian navyभारतीय नौदल