हाजीपूर - बिहारच्या हाजीपूर येथे EVM ठेवलेल्या स्टाँग रूमवरून राजकीय वातावरण तापले आहे. आरजेडीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत गंभीर आरोप केले आहेत. हाजीपूर स्टाँग रूममध्ये विविध विधानसभा मतदारसंघातील CCTV एकापाठोपाठ एक बंद केले जातात. त्यावेळी एक पिकअप व्हॅन आतमध्ये जाते, बाहेर येते असं दिसून येत आहे.
RJD ने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर हा व्हिडिओ शेअर करत पोस्ट केलीय की, वैशाली जिल्ह्यातील हाजीपूर येथे स्टाँगरूममधील सीसीटीव्ही पाळीपाळीने बंद केले जात आहेत. मध्य रात्री याठिकाणी पिक अप व्हॅन आत जाते आणि बाहेर येते. यावर निवडणूक आयोगाने उत्तर द्यायला हवे. देशातील सर्वात मोठा व्होट दरोडेखोर बिहारमध्ये आहे जेणेकरून मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित व्हावे असेही आरजेडीने म्हटलं आहे. हा व्हिडिओ स्ट्राँग रूममध्ये असलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींनी चित्रित केला आहे. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला असे म्हणताना ऐकू येते की रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सीसीटीव्ही स्क्रीन काही मिनिटांसाठी बंद होतील त्या दरम्यान एक वाहन आत येत होते आणि बाहेर पडत होते असा दावा केला जात आहे.
तर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली. वैशालीचे जिल्हा दंडाधिकारी वर्षा सिंह, पोलिस अधीक्षक (एसपी) आणि इतर अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा स्ट्राँग रूमची पाहणी केली. राजद उमेदवार आणि इतर राजकीय पक्षांचे प्रतिनिधीही तेथे पोहोचले.
तपासणीनंतर डीएम काय म्हणाले?
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर डीएम वर्षा सिंह यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत निष्काळजीपणा उघड झाला आहे आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पुढे स्ट्राँग रूमच्या सुरक्षेत कोणतीही हलगर्जीपणा केला जाणार नाही. ईव्हीएम स्ट्राँग रूमला तीन स्तरीय सुरक्षा आहे आणि त्यात कोणत्याही प्रकारची छेडछाड होण्याची शक्यता नाही, प्रशासनाने असेही स्पष्ट केले.
Web Summary : RJD alleges CCTV shutdown and vehicle entry at a Bihar EVM storage site. District officials investigated after the video went viral, promising action if negligence is found. Security is triple-layered.
Web Summary : राजद ने बिहार के एक ईवीएम भंडारण स्थल पर सीसीटीवी बंद होने और वाहन प्रवेश का आरोप लगाया। वीडियो वायरल होने के बाद जिला अधिकारियों ने जांच की, लापरवाही पाए जाने पर कार्रवाई का वादा किया। सुरक्षा तीन स्तरित है।