शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान ; ममतांनी साडी कोणती नेसावी हे प्रशांत किशोर ठरवणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 17:42 IST

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत  झालेला पराभव विसरून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत ममतांनी हालचाली सुरु केल्या आहेत.

कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवणुकीत आलेल्या अपयशानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी प्रसिद्ध राजनीतीज्ञ प्रशांत किशोर यांची मदत घेण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. यावर प्रतिकिया देताना, भाजप नेते मुकुल रॉय यांनी वादग्रस्त विधान केले आहे. प्रशांत किशोर आता ममतांना कोणती साडी नेसावी, हे सांगणार का? असे विधान रॉय यांनी केले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत  झालेला पराभव विसरून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत ममतांनी हालचाली सुरु केल्या आहेत. तर यासाठी राजनीतीज्ञ प्रशांत किशोर यांची मदत घेण्याचा निर्णय  ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. यावर उत्तर देतांना, एके काळी ममता यांच्या मर्जीतील नेते मानले जाणारे आणि आता भाजपमध्ये असेलेल्या मुकुल रॉय यांनी ममतांबद्दल बोलताना  वादग्रस्त  विधान केले आहे. बंगालमध्ये ममतांची लाट ओसरली आसून, त्यामुळे त्यांनी प्रशांत किशोर यांची मदत घेण्याचे ठरवले आहे. ममतांनी साडी कोणती नेसावी, वेणी कशी घालावी आणि हात कसा हालवावा, हे आता प्रशांत किशोर ठरवतील, असे रॉय  म्हणाले.

ममता आणि भाजपमधील वाद आणखीनच पेटताना दिसत आहे. ममतांनी भाजपला थेट आव्हान करत, केंद्रातील योजना राज्यात लागू करण्यासाठी  विरोध केला होता. त्यातच भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसमधील कार्यकर्त्यांचे वाद थेट एकमेकांच्या जीव घेण्यापर्यंत गेला आहे. प्रशांत किशोर हे ममतांना मदतीसाठी आले असल्याने याचा किती फायदा ममतांना होणार हे आता  पुढील काळच ठरवेल.