शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

गर्भपाताचे प्रमाण नियंत्रणात

By admin | Updated: March 4, 2016 02:44 IST

देशात गर्भपाताचे प्रमाण वाढले असल्याच्या वृत्ताचे केंद्र सरकारने खंडन केले असून, हे प्रमाण नियंत्रणात असल्याचा दावा केला.

प्रमोद गवळी,  नवी दिल्लीदेशात गर्भपाताचे प्रमाण वाढले असल्याच्या वृत्ताचे केंद्र सरकारने खंडन केले असून, हे प्रमाण नियंत्रणात असल्याचा दावा केला. सोबतच प्रसूतीदरम्यान मातेच्या मृत्यूचे प्रमाणही दरवर्षी कमी होत असल्याचे स्पष्ट केले.आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी राज्यसभेत खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘इ.स. २००७-२००८ साली केलेल्या जिल्हास्तरीय कुटुंब आणि सुविधा सर्वेक्षण - ३नुसार १५ ते ४९ वर्षे वयोगटातील एकूण विवाहित गरोदर महिलांमध्ये गर्भपाताचे प्रमाण ४.७ टक्के आहे.’उचलण्यात आलेली पावलेनड्डा यांनी सांगितले की, ‘१२ आठवड्यांपर्यंत वाढ झालेल्या गर्भाच्या वारंवार पडण्यामागे हायपोथायरोडिझम हे मुख्य कारण आहे. या आजाराचा धोका असलेल्या महिलांच्या विशेष तपासणीसाठी सर्व राज्यांना निर्देश दिलेले आहेत. याशिवाय माता आणि नवजात बालकांचे मृत्यू रोखण्याकरिता एप्रिल २००५पासून ‘जननी सुरक्षा योजना’नामक सशर्त रोख हस्तांतरण व्यवस्था सुरू केली. त्यानंतर, जून २०११पासून ‘जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम’ अंमलात आला. यामुळे गरोदर महिला आणि आजारी नवजात बालकांसाठी होणारा खर्चाचा बोजा कमी झाला. या योजनेंतर्गत शासकीय इस्पितळांमध्ये प्रसूती करणाऱ्या सर्व गर्भवती महिलांना सिझेरियन सेक्शनसह सर्व उपचार पूर्णपणे नि:शुल्क करण्याचा अधिकार मिळाला आहे. याशिवाय इतरही काही योजना राबविण्यात येत असून, याअंतर्गत गरोदर महिलांची नियमित तपासणी करणे, जीवनसत्त्वाची कमतरता दूर करणे आणि योग्य औषधांचा पुरवठा आदींचा समावेश आहे. महानिबंधक आणि नमुना नोंदणीकरण प्रणालीच्या अलीकडील अहवालानुसार, देशात २०११-१३ या कालावधीत प्रति १ लाख शिशूंच्या जन्मामागे मातामृत्यूचे प्रमाण १६७ एवढे होते. यापूर्वीच्या वर्षांमध्ये ते २१२ आणि १७८ राहिले. हेच प्रमाण बांगलादेशात १७६, पाकिस्तानात १७८, नेपाळमध्ये २५८ आणि अफगाणिस्तानात ३९६ आहे. या देशांच्या तुलनेत आपल्या येथे मातामृत्यूचे प्रमाण कमी आहे. अर्थात, श्रीलंका (३०), मालदीव (६८) आणि भूतानची (१४८) परिस्थिती आपल्यापेक्षा चांगली आहे.