शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? केस उगवले नाहीत म्हणून ग्राहकाने केली अभिनेत्याविरोधात तक्रार, मागितली 5 लाखांची भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 18:58 IST

Hair Cream Product : केस उगवले नाहीत म्हणून संतप्त झालेल्या ग्राहकाने थेट अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

नवी दिल्ली - विविध वस्तूंच्या जाहिराती या वर्तमानपत्र आणि टीव्हीवर दाखवल्या जातात. अनेकदा आकर्षक जाहिराती पाहून ग्राहक देखील त्यांना भूलतात आणि त्या वस्तूंची खरेदी केली जाते. मात्र प्रत्यक्षात त्यांचा परिणाम हा भलताच होतो. अशीच एक घटना केरळमध्ये घडली आहे. जाहिरात पाहून एका ग्राहकांने हेअर क्रीम प्रोडक्टची (Hair Cream Product) खरेदी केली. पण त्याचा काही फायदाच झाला नाही. केस उगवले नाहीत म्हणून संतप्त झालेल्या ग्राहकाने थेट अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली. 

जाहिरातीतून चुकीचा दावा केला म्हणून ग्राहकांने जाहिरातीतील अभिनेत्याला जबाबदार धरलं असून त्याच्याकडे नुकसान भरपाई मागितली आहे. केरळच्या कन्झ्युमर कोर्टनं हेअर क्रीम प्रोडक्ट (Hair Cream Product) च्या जाहिरातीत चुकीचा दावा करणाऱ्या फिल्म अभिनेत्याला जबाबदार ठरवलं आहे. अभिनेत्याने प्रोडक्टबाबत माहिती करून न घेताच जाहिरात केली. थ्रिसूरच्या जिल्हा ग्राहक फोरमनं धात्री हेअर क्रिम (Dhathri Hair cream) तयार करणाऱ्या कंपनी आणि या कंपनीची जाहिरात करणारा अभिनेता अनुपला दंड ठोठावला आहे.

क्रीमचा वापर केल्यानंतर काहीच झाला नाही फायदा 

फ्रान्सिस वडक्कन नावाच्या व्यक्तीने ए-वन मेडिकल्स, धात्री आयुर्वेद प्राइव्हेट लिमिटेड आणि अनुप मेनन यांच्याविरोधात तक्रार केली होती. वडक्कन यांनी केलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी 2012 साली 376 रुपयांमध्ये ही हेअर क्रीम खरेदी केली होती. हेअर क्रीममुळे केस उगवतात अशी जाहिरात पाहिल्यानंतर ही क्रीम खरेदी केली होती. हे प्रोडक्ट सहा आठवडे वापरल्यानंतर हेअर ग्रोथ होईल असा दावा अनुप मेनननं जाहिरातीत केला. मात्र क्रीमचा वापर केल्यानंतर काहीच फायदा झाला नाही. त्यानंतर वडक्कन यांनी फोरमकडे धाव घेतली आणि तक्रार केली. त्यांनी 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली.

लाइव्हलॉच्या एका रिपोर्टनुसार, अनुप मेननने आपण या प्रोडक्टचा वापर केला नसल्याचं म्हटलं आहे. ते फक्त आपल्या आईने तयार केलेल्या हेअर ऑईलचाच वापर करतात असं सांगितलं. जाहिरातीत काय सांगितलं जातं आहे, याची मला माहिती नाही कारण ही मॅन्युफॅक्चर स्टोरी होती. हे हेअर ग्रोथ प्रोडक्ट नाही तर हेअर केअर प्रोडक्ट आहे असं म्हटलं आहे. फोरमने जाहिरातीत देण्यात आलेली आश्वासनं आणि त्याचा वापर केल्यानंतर मिळणारा रिझल्ट यात तफावत आहे. तसंच या प्रोडक्टमध्ये जी नोट देण्यात आली आहे. त्यामध्ये देण्यात आलेल्या सूचनाही नीट दिसत नसल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Keralaकेरळ