शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नवीन संसद भवनाच्या उभारणीस लवकरच सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 02:33 IST

वारसा संवर्धन समितीच्या मंजुरीने मार्ग प्रशस्त

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल विस्टा पुनर्विकास योजनेनुसार १४ सदस्यांच्या वारसा संवर्धन समितीने नवीन संसद उभारण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नवीन संसद उभारण्याचे काम सुरू करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या समितीची मंजुरी घेण्याचे निर्देश सरकारला दिले होते. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी विकासमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे की, नवीन संसद भवन उभारण्यामुळे सध्याच्या संरचनेवर कोणताही परिणाम होणार नाही. गृहनिर्माण सचिव दुुर्गा शंकर मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेकी, १४ सदस्यांच्या समितीने प्रस्तावावर चर्चा करून मंजुरी दिली. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव वारसा संवर्धन समितीचे अध्यक्ष आहेत.  मंजुरी देण्याआधी जाहीर सुनावणी करणे अनिवार्य होते का? असे विचारले असता त्यांनी नाही, असे सांगितले. विविध संस्थांचे अधिकारी आणि तज्ज्ञ या समितीचे सदस्य आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनानंतर लवकर राजपथ पुनर्विकासाचे काम सुरू केले जाईल. हे काम १० महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. पुढच्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन पुनर्विकसित राजपथावर होईल. पाच जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने सेंट्रल विस्टा प्रकल्पाला मिळालेली पर्यावरण मंजुरी आणि जमिनीच्या वापरात बदल करण्यासंदर्भातील अधिसूचना कायम राखत राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंत तीन किलो मीटरच्या परिसरातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला होता. या प्रकल्पाची घोषणा २०१९ मध्ये करण्यात आली होती. नवीन संसद भवनाचे काम ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

टॅग्स :Parliamentसंसदdelhiदिल्ली