शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

निकषात अडकले अंगणवाड्यांचे बांधकाम

By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST

मंजुरी असूनही बांधकाम नाही : ७०० अंगणवाड्या भाड्याच्या जागेत

मंजुरी असूनही बांधकाम नाही : ७०० अंगणवाड्या भाड्याच्या जागेत
नागपूर: सरकारकडून अंगणवाडी बांधकामासाठी जिल्हा परिषदेला दरवर्षी कोट्यवधीचा निधी उपलब्ध केला जातो. परंतु निकषानुसार बांधकामावर प्रत्येकी ४.५० लाखांचा खचं करावयाचा आहे. यात ते शक्य नसल्याने २०११-१२ सालापासून अंगणवाड्यांचे बांधकाम रखडलेले आहे.
जिल्ह्यात २१६१ अंगणवाड्या तर २७८ मिनी अंगणवाड्या आहेत. यातील ७०० अंगणवाड्या ग्रामपंचायत कार्यालय, समाजभवन, शाळा वा भाड्याच्या जागेत भरतात. त्यांना स्वत:च्या इमारती असाव्यात या हेतूने शासनाकडून दरवर्षी निधी उपलब्ध केला जातो. परंतु तो अखर्चित राहतो.
२०११-१२ मध्ये १९३ अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीने ८.६८ कोटींचा निधी दिला. यातील ७३ अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात आले तर १२० बांधकामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. २०१२-१३ या वर्षात ९०अंगणवाड्यासाठी प्राप्त ३.५० कोटीचा निधी अखर्चित आहे.
उपलब्ध निधीनुसार जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने ग्रामपंचायतीकडून अर्ज मागविले होते. परंतु दोन वर्षापूर्वी अंगणवाडी बांधकामासाठी प्रत्येकी ४.५० लाखांचा निधी मिळत होता. यात बांधकाम शक्य नसल्याने ही रक्कम ६ लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. परंतु जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या बांधकामाला या निर्णयाआधीच शासन मंजुरी असल्याने बांधकाम खर्चात वाढ करण्याची गरज आहे. वाढीव खर्चाला मंजुरी नसल्याने कं त्राटदारांकडूनही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे बांधकाम रखडलेले आहे. त्यातच बांधकामाचे प्रस्ताव आधीच मंजूर असल्याने नवीन प्रस्ताव स्वीकारता येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
चौकट.....
प्रशासनाने तोडगा काढावा
जिल्ह्यातील ७००ते ८०० अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नाही. त्या भाड्याच्या वा दुसऱ्याच्या जागेत भरतात. मंजुरी असूनही बांधक ाम होत नसल्याने पोषण आहाराचे साहित्य ठेवायला जागा नाही. त्यामुळे सेविकांना अडचणींना सामोरे जावे लागते. रखडलेले बांधकाम तातडीने पूणंर् करण्यासाठी शासनाने तोडगा काढावा, अशी मागणी जि.प.सदस्य मनोज तितरमारे यांनी केली आहे.