शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांना गोळी घालण्याचा कट उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 11:18 IST

महाशिवरात्रीला त्यांच्यावर गोळी झाडू. या प्रकरणाने हादरलेल्या वैशाली जिल्हा पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

एस. पी. सिन्हापाटणा : केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची महाशिवरात्रीच्या दिवशी हत्या करण्याचा कट रचल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबतचा एक व्हिडीओ तयार करून युवकांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याने खळबळ उडाली. या व्हिडीओत म्हटले आहे की, नित्यानंद यांची सुपारी घेऊन महाशिवरात्रीच्या दिवशी गोळी मारण्याची इच्छा आहे. त्यांच्यावर गोळी झाडल्याचे तीन वर्षांपासून स्वप्नात येत आहे. महाशिवरात्रीला त्यांच्यावर गोळी झाडू. या प्रकरणाने हादरलेल्या वैशाली जिल्हा पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी हाजीपूरमधील बाबा पाताळेश्वर नाथ मंदिरातून निघणाऱ्या मिरवणुकीत केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्यावर हल्ला करण्याची तयारी करण्यात येत होती. दोन दिवसांपूर्वी हा व्हिडीओ तयार करण्यात आला होता. यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. याबाबत माहिती मिळताच पोलिस अधीक्षकांनी एक विशेष पथक तयार करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर एका आरोपी युवकाला अटक करण्यात आली. अटकेतील युवकाची चौकशी करण्यात येत असून, या व्हिडीओत दिसणाऱ्या इतर युवकांचा शोध घेतला जात आहे. तसेच युवकाच्या विरोधात आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेला माधव कुमार ऊर्फ माधव झा हा युवक वैशाली जिल्ह्यातील गोरौलचा रहिवासी आहे. त्याला पोलिसांनी सांची पट्टीच्या एका फ्लॅटमधून अटक केली.

 

टॅग्स :ministerमंत्रीCrime Newsगुन्हेगारी