शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

भारतात कोरोना पसरवण्याचा 'जालिम मुखिया'चा कट उघड, नेपाळ सीमेवर अलर्ट जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 17:00 IST

नेपाळमधील परसा जिल्ह्यात असलेल्या जग्रनाथपूर गावातील रहिवासी 'जालिम मुखिया' याने भारतात कोरोना पसरवण्याचा कट आखला आहे. तो नेपाळमधून 40 ते 50 कोरोना संक्रमित भारतात पाठवण्याच्या तयारीत असल्याचे समजते

ठळक मुद्दे40 ते 50 कोरोना संक्रमित भारतात पाठवण्याची तयारीकुख्‍यात जालिम मुखिया आहे आंतरराष्‍ट्रीय तस्‍करपाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसोबतही जालिम मुखियाचे संबंध असल्याचेही बोलले जाते

नवी दिल्ली -भारतात कोरोना पसरवण्याच्या एका आंतरराष्ट्रीय कटाचा भांडाफोड झाला आहे. यानंतर आता बिहारमधीलनेपाळ सीमेवर सुरक्षा दलाचे जवान सतर्क झाले आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारलाही सविस्तर माहिती देण्यात आलीा आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 24 मार्चपासूनच ही सीमा बंद करण्यात आली आहे.

बिहारच्या पूर्व चंपारणमधील रामगडवा पनकोटा एसएसबी 47व्या बटालियनच्या कमांडंटना मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील परसा जिल्ह्यात असलेल्या जग्रनाथपूर गावातील रहिवासी 'जालिम मुखिया' याने भारतात कोरोना पसरवण्याचा कट आखला आहे. तो नेपाळमधून 40 ते 50 कोरोना संक्रमित भारतात पाठवण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

कुख्‍यात जालिम मुखिया हा आंतरराष्‍ट्रीय तस्‍कर आहे. त्याचे थेट पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसोबत संबंध असल्याचेही बोलले जाते. भारतात बनावट नोटा आणि ड्रग्जच्या तस्करीतही त्याचा हात होता. तो अवैध शस्त्राच्या तस्करीसाठीही कुख्यात होता. मात्र, आता त्याने भारतात कोरोनाचा प्रसार करण्याचा कट रचला आहे.

भारत-नेपाल सीमेवर सतर्कतेचा आदेश -एसएसबी कमांडंट यांच्या सूचनेनंतर आता पश्चिम चंपारणमधील जिल्हाधिकारी कुंदन कुमार यांनी बेतिया आणि बगहा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक, बगहा आणि नरकटियागंज येथील उपविभागीय अधिकारी, तसेच सिकटा, मैनाटांड, गौनाहा आणि बगहा येथील गटविकास अधिकाऱ्यांना अलर्ट केले आहे. यासर्वांना भारत-नेपाळ सीमेवर सतर्क राहण्याचे आणि संशयास्पत हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  याशिवाय या पार्श्वभूमीवर बिहारमधील नेपाळ सीमेवरील इतर जिल्ह्यांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNepalनेपाळBorderसीमारेषाBiharबिहारSoldierसैनिकcollectorजिल्हाधिकारीIndiaभारत