शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

धक्कादायक! विषाणूने दूषित पत्रांद्वारे नेत्यांना कोरोनाबाधित करण्याचे कारस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 07:05 IST

परवडणाऱ्या उपचारखर्चामुळे अनेक जण वाचले असते सरकारी यंत्रणांकडे कोरोना रुग्णांसाठी खाटांची संख्या कमी होती. त्यामुळे खासगी रुग्णालयात आलेल्या रुग्णांकडून उपचारांसाठी भरमसाठ पैसे उकळण्यात आले.

नवी दिल्ली :  कोरोना विषाणूने दूषित असलेली पत्रे राजकीय नेत्यांना पाठवून त्यांना संसर्गाची लागण करण्याचा काही प्रवृत्तींचा डाव आहे. त्यामुळे सावधानता बाळगण्याचा इशारा इंटरपोलने भारतासह इतर देशांनाही दिला आहे. या संघटनेने म्हटले आहे की, कोरोना साथीच्या काळात काही लोक ठरवून पोलीस अधिकारी, डॉक्टर, आरोग्यसेवकांसमोरच थुंकल्याच्या घटना घडल्या आहेत. थुंकी, कफातून या रोगाचा प्रसार होतो हे माहीत असूनही ही नाठाळ कृती या लोकांनी केली होती. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूने दूषित पत्रे राजकीय नेत्यांना पाठविण्याचा प्रयत्नही होऊ शकतो. त्याने कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता खूपच मर्यादित आहे. मात्र, तरीही सर्वांनी सावधगिरी बाळगायला हवी, असेही इंटरपोलने विविध देशांना कळविले आहे.

परवडणाऱ्या उपचारखर्चामुळे अनेक जण वाचले असते सरकारी यंत्रणांकडे कोरोना रुग्णांसाठी खाटांची संख्या कमी होती. त्यामुळे खासगी रुग्णालयात आलेल्या रुग्णांकडून उपचारांसाठी भरमसाठ पैसे उकळण्यात आले.  उपचारांचा खर्च खिशाला परवडणारा असता, तर कोरोनाचे अनेक रुग्ण वाचू शकले असते, असे निरीक्षण आरोग्य या विषयावरील संसदीय समितीने एका अहवालात नोंदविले आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूकही केंद्र सरकारने वाढवावी, असेही या समितीने म्हटले आहे. समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार रामगोपाल यादव हे प्रमुख असलेल्या या समितीने अहवाल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना सादर केला.

केंद्रीय गृहमंत्रालय सतर्कदेशाची राजधानी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उद्रेकाचे केंद्र झाल्याने राज्य व केंद्र सरकारमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दिल्लीत घरोघरी जाऊन ५० लाख लोकांची पाहणी करण्याच्या योजनेची युद्धपातळीवर अंमलबजावणी सुरू आहे. शनिवारी पहिल्यांदाच कोरोनाचे निदान करण्यासाठी अँटिजनऐवजी सर्वाधिक आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्याचे केंद्रीय गृहविभागाने स्पष्ट केले आहे. रुग्णसंख्या वाढल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. कोविड खाटांची संख्या व दररोज चाचण्या वाढवण्यावर आता भर आहे. डीआरडीओचे नवे २५० व्हेंटिलेटर्स असलेले रुग्णालयदेखील सज्ज ठेवण्यात आले आहे.   

टॅग्स :delhiदिल्लीcorona virusकोरोना वायरस बातम्याMiniमिनी