शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

महिला आरक्षण विधेयकावर सहमतीचे प्रयत्न

By admin | Updated: March 9, 2016 05:09 IST

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून संसदेच्या दोन्ही सभागृहात मंगळवारी सर्व पक्षांच्या महिला सदस्यांनी महिला आरक्षण विधेयक तातडीने मंजूर करून घेण्याची मागणी उचलून धरली

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून संसदेच्या दोन्ही सभागृहात मंगळवारी सर्व पक्षांच्या महिला सदस्यांनी महिला आरक्षण विधेयक तातडीने मंजूर करून घेण्याची मागणी उचलून धरली. तर सरकारनेही या विधेयकावर सर्व सर्वसहमतीचे प्रयत्न सुरू असून यात लवकरच यश मिळेल, अशी आशा व्यक्त केली.संसदेत या विषयावर झालेल्या चर्चेचा समारोप करताना सांसदीय कामकाज मंत्री एम.वेंकय्या नायडू यांनी सांगितले की, यापूर्वीच्या संपुआ सरकारकडून तब्बल दहा वर्षे या मुद्यावर सर्वसहमतीचे प्रयत्न झाले आणि विद्यमान सरकारनेही या दिशेने सातत्याने पावले उचलली आहेत. लोकसभा आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षणाचा प्रस्ताव या विधेयकात आहे. काही वर्षांपूर्वी राज्यसभेत हे विधेयक संमत करण्यात आले होते. परंतु अनेक पक्षांच्या तीव्र विरोधामुळे ते लोकसभेत अडकले. विरोधी पक्षाच्या एका सदस्याने यासंदर्भात ठोस आश्वासनाची मागणी करताच नायडू यांनी पलटवार केला आणि काँग्रेसप्रणीत सरकार १० वर्षे यावर सर्वसहमती बनवू शकले नाही असा टोमणा त्यांनी मारला. तसेच मोदी सरकारने महिला सबलीकरणासाठी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ सारख्या अनेक योजना सुरू केल्या असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, कठोर कायदानिर्मितीनंतरही हुंडाबळी, बालविवाह, बलात्कारासह महिलांवरील अत्याचार सुरूच आहेत. महिलांप्रती मानसिकता बदलण्याच्या दृष्टीने समाजाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. तत्पूर्वी लोकसभेत चर्चेची धुरा महिला सदस्यांनी सांभाळली आणि महिला व बालिका सबलीकरण, समानतेसाठी मुलींना दर्जेदार शिक्षण, आर्थिक स्वावलंबनासोबतच हुंडाबळी, भ्रूणहत्या आणि बलात्कारासारख्या गुन्ह्णांसाठी कठोर कायदा तसेच समाजाची मानसिकता बदलण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली. सदस्यांनी लोकसभा आणि विधानसभांसोबतच केंद्र सरकारचे विविध विभाग, संसदीय समित्या आणि इतर समित्यांवरही महिलांना किमान ३३ टक्के आरक्षणाची मागणी केली. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सुद्धा निर्णय प्रक्रिया, राष्ट्र निर्माण आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विकास कार्यांमध्ये महिलांच्या जास्तीतजास्त सहभागाच्या दिशेने सातत्याने प्रयत्न व्हावेत, असे मनोगत व्यक्त केले. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच सभापती हमीद अन्सारी यांनी सदस्यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाता योग्य दिशा देण्यात तसेच समाज निर्मितीत महिला महत्त्वाची भूमिका वठवित आहेत. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासात महिलांचे योगदान नाकारता येणार नाही, असे ते म्हणाले. शून्य प्रहरात बोलण्यासाठी नोटीस देणाऱ्या सर्व महिला खासदारांना या विषयावर आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली. (लोकमत न्यूज नेटवर्क)काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बहुप्रतीक्षित महिला आरक्षण विधेयक तातडीने संमत करण्याची मागणी करतानाच आम्हाला आमचे हक्क मिळालेच पाहिजेत असे कठोर शब्दांत सांगितले. यासोबतच त्यांनी सुशासनाच्या घोषणेवरून सरकारवर हल्ला करताना सांगितले की, जास्तीतजास्त सुशासनाचा अर्थ सूडाची भावना न बाळगता विरोधी विचार स्वीकारणे हा सुद्धा होतो.काँग्रेस अध्यक्षांनी काही भाजपाशासित राज्यांमध्ये स्थानिक स्वराज संस्था निवडणूक लढविण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीका करताना सांगितले की, हा निर्णय अनुसूचित जाती जनजातीच्या महिलांना त्यांच्या संवैधानिक अधिकारांपासून वंचित ठेवणारा आहे. लोकसभेत महिला सबलीकरणावरील चर्चेला सुरुवात करताना सोनिया गांधी यांनी महिलांच्या उत्थानात काँग्रेस पक्षाची भूमिका विशद केली. काँग्रेसनेच देशाला पहिली महिला पंतप्रधान, राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षही दिल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भाजपच्या पुनम महाजन, जयश्रीबेन पटेल, तृणमूल काँग्रेसच्या शताब्दी राय यांच्यासह अनेक महिला सदस्यांनी आपले मत व्यक्त केले. महिला स्वातंत्र्याची मागणीआम्हाला आमच्या गर्भात वाढणाऱ्या भ्रूण जन्माचे, मंदिर व दर्ग्यामध्ये प्रवेशाचे तसेच इच्छेनुसार वेशभूषा करण्याचे स्वातंत्र्य पाहिजे, अशी मागणी महिला खासदारांनी संसदेत केली. सर्व सामाजिक कुप्रथांमधूनही महिलांना मुक्त करा,असे आवाहन त्यांनी केले.