शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

१५५ देशांच्या पाण्याने राममंदिराचा अभिषेक; ४० देशातून आले अनिवासी भारतीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 11:13 IST

आठ देशांचे राजदूत, ४० देशांतील अनिवासी भारतीयांची उपस्थिती

अयोध्या : अक्षय तृतीयेच्या दिवशी अयोध्येतील राममंदिराचा १५५ देशांच्या पाण्याने अभिषेक करण्यात आला. यात अमेरिकेतील १४ मंदिरे आणि १२ नद्यांच्या पाण्याचाही समावेश करण्यात आला होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आठ देशांचे राजदूत, ४० देशांतील अनिवासी भारतीय अयोध्येत आले होते. 

यात ताजिकिस्तानचा ताज मोहम्मद यांचाही समावेश होता. बाबरच्या जन्मभूमीतील  कश्क-ए-दरिया या नदीसह अनेक मुस्लीम देशांतील नद्यांचे पाणी त्यांनी पाठविले आहे. मणिराम छावणीच्या सभागृहात सकाळी १० वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक इंद्रेश यांनी ‘भारत जय जगत’ ही नवी घोषणा दिली. दिल्ली भाजपचे माजी आमदार विजय जॉली व श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जॉली म्हणाले, “जलाभिषेकसाठी १५५ देशांतून पाण्याचे कलश अयोध्येत आणण्यात आले. यात उझबेकिस्तानची चिरचिक नदी, ताजिकिस्तानची वख्श नदी, युक्रेनची डनिस्टर, रशियाची व्होल्गा, मॉरिशसमधील गंगा तलाव व हिंदी महासागरातील पाण्याचाही समावेश आहे.

पाणी मिळविण्यासाठी लागले ३१ महिने...“आमच्या जलाभिषेक कार्यक्रमासाठी इतक्या देशांतून पाणी गोळा करायला ३१ महिने लागले. स्टॉकहोम येथील आशिष ब्रह्मभट्ट यांनी कोरोनानंतरच्या पहिल्या विस्तारा फ्लाइटमध्ये पाणी पाठवले. आम्ही युक्रेन व रशियासह चीन, पाकिस्तान व अफगाणिस्तान येथूनही पाणी आणले, असे जॉली यांनी सांगितले.

अयोध्येत काम सुरू असलेल्या राममंदिराच्या अभिषेकासाठी विविध ठिकाणांहून आलेल्या भाविकांनी पाणी आणले होते. 

 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर