शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

...तर एनडीएतून बाहेर पडू; आणखी एका 'मित्रा'चा मोदी-शहांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 11:23 IST

मेघालयचे मुख्यमंत्री आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे अध्यक्ष कॉनराड संगमा यांनी आम्ही लवकरच एनडीएतून बाहेर पडू, असं विधान केलं आहे.

ठळक मुद्देमेघालयचे मुख्यमंत्री आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे अध्यक्ष कॉनराड संगमा यांनी आम्ही लवकरच एनडीएतून बाहेर पडू, असं विधान केलं आहे. भाजपाला एक एक मित्र पक्ष सोडून जात असताना कॉनराड संगमा यांनी घेतलेली भूमिका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. NDAतून बाहेर पडण्याच्या योग्य वेळेची आम्ही वाटत पाहत आहोत, असं म्हणत त्यांनी भाजपाला एक प्रकारे सूचक इशारा दिला आहे.  

शिलाँग- मेघालयचे मुख्यमंत्री आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे अध्यक्ष कॉनराड संगमा यांनी आम्ही लवकरच एनडीएतून बाहेर पडू, असं विधान केलं आहे. भाजपाला एक एक मित्र पक्ष सोडून जात असताना कॉनराड संगमा यांनी घेतलेली भूमिका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. NDAतून बाहेर पडण्याच्या योग्य वेळेची आम्ही वाटत पाहत आहोत, असं म्हणत त्यांनी भाजपाला एक प्रकारे सूचक इशारा दिला आहे.  नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून संगमा आणि मोदी सरकारमध्ये वाद आहे. या विधेयकावरून अनेक मित्र पक्षांनी भाजपाला एनडीएतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. जर केंद्र सरकारनं हे विधेयक राज्यसभेत आणलं तर आम्ही तात्काळ एनडीएतून बाहेर पडू, असंही संगमा म्हणाले आहेत. एनपीपीच्या पाठिंब्यावरच मणिपूर आणि अरुणाचलमध्ये भाजपाचं सरकार आहे. तर मेघालयमध्ये एनपीपीच्या सरकारला भाजपाचा पाठिंबा आहे. तसेच संगमा यांनी पूर्वोत्तर राज्यांतील दुसऱ्या पक्षांनाही नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्याचं अपिल केलं आहे. लोकसभेत मंजूर झालेले हे विधेयक राज्यसभेत प्रलंबित आहे.नागरिकत्व दुरुस्ती विधेयकात असं प्रावधान आहे की, ज्याने पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या सहा अल्पसंख्याक समाजांच्या मुस्लिम लोकांना सर्व अडचणी संपवून भारतीय नागरिकत्व बहाल केलं जाणार आहे. आम्ही दुसऱ्या पक्षांबरोबर मिळून नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करू, कारण या विधेयकामुळे लोकसंख्या नियंत्रण कायद्यात मोठा बदल होणार आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे राज्यसभेत मंजूर होऊ नये, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असंही संगमा म्हणाले आहेत. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे वेळ मागितला होता. परंतु पीएमओनं आम्हाला अजून वेळ दिलेली नाही, असंही संगमा यांनी स्पष्ट केलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी