शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अहमद पटेल यांच्यावर भाजपाचे गंभीर आरोप, अजिबात तथ्य नसल्याचा काँग्रेसचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 02:50 IST

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांमुळे वातावरण तापू लागले असतानाच, मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार व राज्यसभा सदस्य अहमद पटेल यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

अहमदाबाद : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांमुळे वातावरण तापू लागले असतानाच, मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार व राज्यसभा सदस्य अहमद पटेल यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अटक करण्यात आलेल्या एका दहशतवाद्याशी खा. अहमद पटेल यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.भडोचच्या सरदार पटेल हॉस्पिटल अ‍ॅण्ड हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये इको कार्डिओग्राम टेक्निशिअन असलेल्या मोहम्मद कासिम या तरुणाला नोकरी सोडल्यानंतर अटक करण्यात आली. त्याचा इसिसशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अहमद पटेल यांच्यासह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी विजय रूपाणी यांनी केली आहे.गुजरात एटीएसने इसिसशी संबंधित ज्या दोन जणांना बुधवारी अटक केली, त्यात कासिमचा समावेश आहे. निवडणुकांच्या काळात तसेच काही धार्मिक स्थळांवर दहशतवादी हल्ले करण्याची त्यांची योजना होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. कासिम व ओबैद अशी त्यांची नावे आहेत. सरदार पटेल रुग्णालयात कासिम नोकरी करीत होता आणि खा. पटेल रुग्णालयाचे विश्वस्त होते. त्यामुळे दोन्हींचा संबंध जोडण्याचा मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केला. खा. अहमद पटेल हे आजही रुग्णालयाचे सर्वेसर्वा असल्याचे मुख्यमंत्री रूपाणी म्हणाले.मात्र अहमद पटेल यांनी २0१४ सालीच विश्वस्तपदाचा राजीनामा दिला आहे आणि आता त्यांचा रुग्णालयाशी संबंध नसल्याचे रुग्णालयाच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे.त्याला नोकरी देताना, त्याची पार्श्वभूमी माहीत नव्हती, असेही रुग्णालयाने म्हटले आहे. काँग्रेसनेही मुख्यमंत्री रूपाणी यांचा आरोप बिनबुडाचा असल्याचे सांगून, आपले अपयश झाकण्यासाठी भाजपा असे आरोप करीत आहे, अशी टीका केली आहे. (वृत्तसंस्था)इसिसशी संबंध असल्याच्या आरोपावरून या दोघांना २५ आॅक्टोबर रोजी सुरतमधून अटक करण्यात आली होती. अहमदाबादमधील खडिया भागात असलेल्या सिनेगॉग (ज्यूंचे प्रार्थना स्थळ)ची त्यांनी पाहणी करून ठेवली होती. त्या दोघांवर जमाईकामधील अब्दुल्ला अल फैसल याचा प्रभाव होता. त्यानेच त्यांची माथी फिरवली होती, असे सांगण्यात येते. धार्मिक स्थळांवर हल्ले करून परदेशात पळून जाण्याची त्यांची योजना होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांनी पासपोर्टही तयार ठेवले होते. 

टॅग्स :Ahmed Patelअहमद पटेलBJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस