शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

हिंदूंना विभाजित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, लिंगायत समाजाच्या मुद्द्यावरून भाजपाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 10:48 IST

काँग्रेस सरकारनं कर्नाटक विधानसभेत लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याकांचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. कर्नाटक सरकारने यंदा होऊ घातलेल्या निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतल्यानं भाजपानं काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.

बंगळुरू- काँग्रेस सरकारनं कर्नाटक विधानसभेत लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याकांचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. कर्नाटक सरकारने यंदा होऊ घातलेल्या निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतल्यानं भाजपानं काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. सिद्धरामय्या सरकारच्या या निर्णयानंतर जोरदार गोंधळ सुरू झाला आहे.भाजपानं या निर्णयावर टीका केली आहे. तसेच कर्नाटकमध्ये हिंदूंना विभाजित करण्याचं काम काँग्रेस करत असल्याचा आरोपही केला आहे. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. गौडा म्हणाले, ऑगस्ट 2014मध्ये महाराष्ट्रातील पृथ्वीराज चव्हाण सरकारनं अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. परंतु केंद्रातील यूपीए सरकारनं तो प्रस्ताव झिडकारला आहे. सिद्धरामय्या यांनी याची माहिती नाही काय ?, असा सवालही सदानंद गौडा यांनी विचारला आहे.कर्नाटक सरकारचा हा निर्णय म्हणजे हिंदूंचं धुव्रीकरण करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे कर्नाटकातील राजकारण प्रभावित होऊ शकतो. लिंगायत समाजाला स्वतःकडे आकर्षित करण्यासाठीच काँग्रेसनं हा निर्णय घेतल्याचा आरोप भाजपानं केला आहे. भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा हेसुद्धा लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व करतात. कर्नाटकात लिंगायत/वीरशैव समाजाची लोकसंख्या 17 टक्के आहे. काँग्रेस शासित कर्नाटकमध्ये भाजपा हा पारंपरिक मतदार आहे. काँग्रेस दोन समाजांत फूट पाडा आणि राज करा ही रणनीती अवलंबते आहे, असा आरोप भाजपा महासचिव पी. मुरलीधर राव यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

टॅग्स :BJPभाजपाKarnatakकर्नाटक