शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

जि.प.मध्ये काँग्रेस झाली आक्रमक

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

फोटो आहे...उपासराव भुते यांचे उपोषण: नारेबाजी करीत माठ फोडलेनागपूर : कुही तालुक्यातील मांढळ येथील नळ योजनेतील भ्रष्टाचाराला दोषी असलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात यावे, यासाठी काँग्रेस सदस्यांच्या नेतृत्वात शुक्रवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी कार्यालयात शिरून अध्यक्षांच्या कक्षापुढे नारेबाजी केली. गेटजवळ ...


फोटो आहे...
उपासराव भुते यांचे उपोषण: नारेबाजी करीत माठ फोडले
नागपूर : कुही तालुक्यातील मांढळ येथील नळ योजनेतील भ्रष्टाचाराला दोषी असलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात यावे, यासाठी काँग्रेस सदस्यांच्या नेतृत्वात शुक्रवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी कार्यालयात शिरून अध्यक्षांच्या कक्षापुढे नारेबाजी केली. गेटजवळ माठ फोडून प्रशासन व पदाधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. याच मागणीसाठी जि.प.सदस्य उपासराव भुते कार्यालय परिसरात उपोषणाला बसल्याने काँगे्रस आक्रमक झाल्याचे चित्र बघायला मिळाले.
आंदोलक कार्यालयात शिरल्याने पोलिसांचा गांंेधळ उडाला. मदतीला जादाची कुमक बोलावून सर्वाना ताब्यात घेतले. सदर पोलीस स्टेशनला नेल्यानंतर आंदोलकांची सुटका करण्यात आली. परंतु सुटका होताच आंदोलक पुन्हा जि.प.मध्ये धडकले. भुते यांच्यासह जि.प.तील विरोधी पक्षनेेते मनोहर कुंभारे, सदस्य मनोज तितरमारे, शिवकुमार यादव, नाना कंभाले, सरिता रंगारी, बबिता साठवणे, आदींनी आक्रमक भूमिका घेत मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांच्याकडे दोषीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. समितीला दोषी ठरविले मग योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही, असा सवाल करीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, तसेच मांढळ येथे नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याची मागणी केली.
पंचायत समितीच्या सभापती सुनीता पडोळे, माजी सभापती यशोधरा नागदेवे, नंदा तिजारे, सरपंच रोशन सोनकुसरे, नाना सूर्यवंशी, विनय गजभिये यांच्यासह मांढळ येथील शेकडो नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.आंदोलनामुळे तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याने जि.प.ला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.(प्रतिनिधी)
चौकट...
प्रमुख मागण्या
पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार करणारे तत्कालीन प्रकल्प अधिकारी, उपअभियंता, शाखा अभियंता यांच्या पोलिसात गुन्हे दाखल करा, मांढळ येथे नवीन योजनेला तात्काळ मंजुरी द्यावी.
चौकट...
सोमवारी बैठक
पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी बैठक आयोजित केली आहे. यात तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही देत उपोषण मागे घेण्याचे आवाहन जोंधळे यांनी केले. परंतु बैठकीचे पत्र न मिळाल्याने भुते यांच्यासह सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.