शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेस सत्तेत आल्यावर मोदी सरकारचे तिन्ही कृषी कायदे रद्द करेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 09:04 IST

उत्तर प्रदेशात शेतकरी पंचायतीला उपस्थिती

लखनौ : काँग्रेस सत्तेत आल्यावर मोदी सरकारने केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द केले जातील, असे प्रतिपादन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारी सहारणपूर येथील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात केले. ही शेतकरी पंचायत काँग्रेसने आयोजित केली होती. या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा मोदी सरकार अपमान करीत आहे.   शेतकऱ्यांच्या विरोधात मोदी सरकार काम करीत आहे, असा आरोपही प्रियांका गांधी यांनी केला. हे तिन्ही कायदे राक्षसी असून, ते ताबडतोब रद्द होणे आवश्यक आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, या कायद्यांविरोधात काँग्रेस पक्ष सतत लढत राहील. काँग्रेस सातत्याने शेतकऱ्यांच्या बाजूने लढत राहिला आहे.   कृषी कायद्यांच्या विरोधात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसने उत्तर प्रदेशात मेळावे आयोजित करण्याचे ठरविले आहे. त्यातील हा पहिला मेळावा होता. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागावर जोर देण्याचे ठरविले आहे. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार असून, त्याची ही तयारी आहे. प्रियांका गांधी यांच्यावर उत्तर प्रदेशच्या पश्चिम विभागाची जबाबदारी आहे.सहारणपूर जिल्ह्यातील चिलकाना येथे बुधवारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी किसान महापंचायतला उपस्थित होत्या. (इन्सेटमध्ये) राजस्थानमधील काँग्रेसच्या विधानसभा सदस्य इंदिरा मीना या बुधवारी जयपूरमध्ये विधानसभेत लक्षवेधीरीत्या पोहोचल्या. मीना या आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी ट्रॅक्टरवर आल्या होत्या.शेतकऱ्यांचे आंदोलन जमीन, देश आणि मुलांसाठी...प्रियांका गांधी म्हणाल्या, ‘शेतकरी आंदोलन करीत आहेत, ते स्वत:चे जीवन, जमीन, देश आणि मुलांसाठी. जी व्यक्ती त्यांची थट्टा करते, त्यांना दहशतवादी व देशद्रोही ठरवले. ती कधीही देशभक्त असत नाही की, असणारही नाही. सत्ताधारी भाजपने शेतकऱ्यांना आश्वासन देऊनही साखर कारखान्यांकडून त्यांना पैसे मिळालेले नाहीत.’

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीFarmers Protestशेतकरी आंदोलन