शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 06:35 IST

कॉँग्रेसने आपले निवडणूक मुद्दे समोर ठेवून या मुद्यांच्या आधारे निवडणूक जिंकून दाखवावी,असे आव्हान भाजपाला दिले

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : महाराष्ट्र, हरियाणामध्ये निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर कॉँग्रेसने आपले निवडणूक मुद्दे समोर ठेवून या मुद्यांच्या आधारे निवडणूक जिंकून दाखवावी, असे आव्हान भाजपाला दिले आहे.पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा यांनी निवडणुकांच्या तारखांचे स्वागत केले. ज्या देशामध्ये एक राष्ट्र एक निवडणूक या तत्वाची शिफारस केली जात असेल तेथे झारखंड आणि दिल्लीस वगळण्यात का आले? असा प्रश्नही केला. निवडणूक आयोग या दोन राज्यांमध्ये महाराष्ट्र, हरियाणा सोबत निवडणूक घेण्यास सक्षम नाही का,असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कॉर्पोरेट टॅक्समध्ये सूट देऊन भाजप आणि सरकार कोणता संदेश देऊ इच्छित आहे, असा प्रश्न करत खेडा म्हणाले की, गेल्या ३ महिन्यांमध्ये १५ लाख रोजगार गेले. २० लाख कोटी स्टॉक मार्केटमध्ये बुडाले. अनेक कारखाने बंद झाले. अनेक बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तरीही हे सरकार कॉर्पोरेट करात सवलत दिल्याचा आनंद साजरा करत आहे. याच मुद्दयांवर पक्ष जनतेमध्ये जाईल. सरकारला उत्तरे मागेल, असे खेडा यांनी स्पष्ट केले. ज्या ११ अधिकाऱ्यांनी फाईलवर स्वाक्षरी केली, त्यांच्यापैकी कोणावर काय कारवाई झाली?असा प्रश्न करत कॉँग्रेसने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची बाजू उचलून धरली. सरकार केवळ वचपा काढण्याच्या भावनेतून चिदंबरम यांची नाचक्की होईल, असे पाहत आहे. तसे नसते तर संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधातही तपास यंत्रणांनी गुन्हे दाखल केले असते. सर्वांना समान न्यायाच्या तराजूमध्ये ठेवून एखाद्या निर्णयापर्यंत सरकार पोहोचले असते, असे खेडा यांनी म्हटले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस