शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकमध्ये काँग्रेस स्वबळावर विधानसभा निवडणुका लढणार, उमेदवारांची पहिली यादी सोमवारी होणार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 09:09 IST

कर्नाटक विधानसभेत २२४ सदस्य आहेत.  काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर करणार आहे.

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. यासंदर्भात पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्ली येथे झाली. त्यावेळी या निवडणुकांत कोणाशीही युती न करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला. काँग्रेस आपल्या ११० उमेदवारांची पहिली यादी येत्या सोमवारी जाहीर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) तसेच अन्य कोणत्याही पक्षासोबत काँग्रेस युती करणार नसल्याचे कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीला पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी हे उपस्थित होते. 

कर्नाटक विधानसभेत २२४ सदस्य आहेत.  काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर करणार आहे. विद्यमान आमदारांपैकी चार पाच जणांचा अपवाद वगळता अन्य आमदारांना पुन्हा तिकीट दिले जाणार आहे. कर्नाटकमधील सध्याच्या विधानसभेची मुदत येत्या मे महिन्यात संपत असून, त्याआधी विधानसभा निवडणुका होणे आवश्यक आहे. या निवडणुकांत काँग्रेस उमेदवारी देताना युवक व महिलांना प्राधान्य देणार आहे. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य काँग्रेसने ठेवले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :congressकाँग्रेसKarnatakकर्नाटक