शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राची कृषी कायद्यांवर माघार, काँग्रेस साजरा करणार 'शेतकरी विजय दिवस'; शनिवारी संपूर्ण देशभरात होणार सेलिब्रेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 20:42 IST

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस पक्षानंही आता कृषी कायद्यांवरुन सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागल्यानं आता जोरदार सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं आहे. 

नवी दिल्ली-केंद्र सरकारनं आज वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे आज मागे घेत असल्याचं जाहीर केलं आणि मोदी सरकार बॅकफूटवर आल्याचं पाहायला मिळालं. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ९ वाजता जनतेशी संवाद साधत तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. मोदींच्या या घोषणेनंतर आंदोलक शेतकऱ्यांनी लढ्याला यश आल्याची भावना व्यक्त केली आहे. तर विरोधकांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस पक्षानंही आता कृषी कायद्यांवरुन सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागल्यानं आता जोरदार सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं आहे. 

शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तीन कृषी कायदे आज रद्द झाल्याबद्दल आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठं यश प्राप्त झाल्याचं सेलिब्रेशन संपूर्ण देशभरात करणार असल्याचं काँग्रेस पक्षानं ठरवलं आहे. शनिवारी २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशभरात काँग्रेसच्या वतीनं 'शेतकरी विजय दिवस' (Kisan Vijay Diwas) साजरा करण्यात येणार आहे. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी सर्व राज्यांच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना २० नोव्हेंबरला शेतकरी विजय दिवस साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याअंतर्गत ठिकठिकाणी रॅली आणि आंदोलनात प्राणांची आहुती दिलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली म्हणून कँडल मार्च आयोजित करण्याची सूचना देण्यात आली आहे. 

वेणुगोपाल यांनी सर्व राज्यांच्या काँग्रेस प्रभारींना पत्र लिहिलं असून यात शेतकरी आंदोलन आणि त्यांचं बलिदान व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली एकजूट होऊन केल्या गेल्या आंदोलनानंतर जाचक तीन कृषी कायदे रद्द केले गेले आहेत. आज सर्वांनी एकजुटीनं वाईटावर मात केली आहे आणि हे यश देशाच्या पोशिंद्याला समर्पित आहे, असं म्हटलं आहे. 

मोदींनी आज जनतेसमोर येत मागे घेतले कृषी कायदेपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहन मोदींनी केलं. 

शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे देशात तीन कृषी कायदे आणले. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळावा, त्यांना शेतमाल विकण्यासाठी अनेक पर्याय मिळावे हा उद्देश त्यामागे होता. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांचे आभार मानतो. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही तीन कायदे आणले. मात्र इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. कदाचित आमच्या प्रयत्नांमध्ये काही उणीव, त्रुटी राहिली असेल. त्यामुळे तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं मोदींनी जाहीर केलं.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपcongressकाँग्रेस