शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

हिंदूविरोधी भूमिका पुसण्यासाठीच काँग्रेसनं सनातनवर घातली नव्हती बंदी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 17:29 IST

अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणा-या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक-यांना केंद्रीय तपास यंत्रणे(सीबीआय)नं काही दिवसांपूर्वीच ताब्यात घेतलं.

नवी दिल्ली- अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणा-या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक-यांना केंद्रीय तपास यंत्रणे(सीबीआय)नं काही दिवसांपूर्वीच ताब्यात घेतलं. त्यानंतर आता सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सनातन संस्थेवर 2013मध्ये बंदी घालण्याची पूर्ण तयारी झाली होती. परंतु ऐनवेळी यूपीए सरकारनं हा निर्णय बदलला. कारण पुढच्याच वर्षी 2014ला लोकसभेच्या निवडणुका होणार होत्या. त्यामुळे काँग्रेसला हिंदू मतांचं ध्रुवीकरण टाळायचं होतं. 

सनातन संस्था ही एक कट्टर हिंदुत्ववादी संघटना आहे. जिची स्थापना डॉ. जयंत बालाजी आठवले यांनी 1990मध्ये केली. सनातन संस्था गोवा चॅरिटी संस्थेच्या नावानं नोंदणीकृत आहे. ही संस्था सनातन प्रभात या वृत्तपत्राचं प्रकाशनही करते. संघटनेचं एक मोठं कार्यालय पनवेलमध्ये आहे. पुणे, मुंबई, सांगली आणि राज्यातील इतर भागातही सनातनची कार्यालये आहेत. ज्यावेळी दाभोलकर, कलबुर्गी आणि पानसरे यांच्या हत्या झाल्या त्यावेळी या हत्यांचा संबंध सनातनशी जोडण्यात आला. त्यानंतर तत्कालीन यूपीए सरकारनं सनातन संस्थेवर बंदी घालावी, अशी मागणी केली जाऊ लागली.अनेक प्रयत्न करूनही सनातनवर बंदी घालण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. निवडणुका जवळ असल्यानं काँग्रेसला स्वतःची प्रतिमा हिंदूविरोधी करून घ्यायची नव्हती, असंही काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं होतं. सनातन संस्थेवर बंदी घातलेली 1000 पानांची फाईल दोन वर्षांपासून गृहमंत्रालयात धूळखात पडून आहे. या फाइलवर गृहमंत्रालयानं निर्णय घ्यायचा होता. परंतु काँग्रेस ते धाडस दाखवू शकलेली नव्हती. कारण काँग्रेसला हिंदू व्होट बँकेची भीती वाटत होती. गेल्या तीन-चार वर्षांत सनातनवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचंही सनातन संस्थेचे प्रवक्ते शंभू गवारे यांनी सांगितलं आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी