शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आसाराम तर बहाणा, मोदींवर निशाणा; काँग्रेसकडून मोदी, आसारामचा व्हिडिओ ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 15:31 IST

व्हिडिओमध्ये मोदी आणि आसाराम एकमेकांची स्तुती करताना दिसत आहेत

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूला जोधपूर कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यानंतर काँग्रेसनं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन आसाराम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मोदी आणि आसाराम एकत्र दिसत आहेत. 'माणूस त्याच्या संगतीवरुनच ओळखला जातो,' असं ट्विट करत काँग्रेसनं मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसनं मोदी आणि आसारामचा व्हिडिओ ट्विट करत अप्रत्यक्षपणे मोदींना लक्ष्य केलं आहे. यानंतर काही ट्विटर वापरकर्त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांबरोबरचे आसारामचे फोटोदेखील पोस्ट केले आहेत. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आसारामचे आशीर्वाद घेत असतानाच फोटो काहीजणांनी ट्विटरवर शेअर केला आहे. दिग्विजय सिंह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी आसारामच्या आश्रमासाठी जमीन देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र लैंगिक अत्याचार प्रकरणात आसारामला 2013 मध्ये अटक करण्यात आल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी त्यांच्या निर्णयाबद्दल पश्चाताप व्यक्त केला होता. 

जोधपूर मध्यवर्ती कारागृह न्यायालयानं अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आसाराम बापूसह तीन आरोपींना दोषी ठरवलं आहे, तर दोन जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. आसाराम, शिल्पी व शरदचंद्र या तिघांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. प्रकाश व शिवा या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर शिल्पी आणि शरद या दोषींना प्रत्येकी 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 

टॅग्स :Asaram Bapuआसाराम बापूNarendra Modiनरेंद्र मोदी