शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

भावी नेते घडविण्यासाठी काँग्रेसचा अभ्यासवर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 05:55 IST

राहुल गांधी पक्षाध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये नवीन प्रयोग सुरु केले आहेत.

शीलेश शर्मानवी दिल्ली : राहुल गांधी पक्षाध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये नवीन प्रयोग सुरु केले आहेत. रा. स्व. संघ व कम्युनिस्टांनी ज्या पद्धतीने संघटना मजबूत केली त्याच धर्तीवर काँग्रेस आता युवा कार्यकर्त्यांना घडवणार आहे. काँग्रेसची विचारप्रणाली व संस्कृतीची युवा कार्यकर्त्यांना संपूर्ण ओळख करुन देण्यासाठी अभ्यासवर्ग चालविण्याचा उपक्रम या पक्षाने हाती घेतला आहे. काँग्रेसची विचारधारा अंगी बाणविलेल्या या युवा कार्यकर्त्यांतून मग पक्षाचे भावी नेते घडविण्यात येतील.अभ्यासवर्गाची जबाबदारी एनएसयूआयवरया अभ्यासवर्गाच्या आयोजनाची जबाबदारी एनएसयूआयवर सोपवली आहे. काँग्रेसमध्ये दुसऱ्या व तिसºया फळीतील उत्तम नेत्यांची उणीव भासत असून त्यावर पक्षाने आजवर गांभीर्याने विचार केला नव्हता. काँग्रेस पक्षात युवा नेते असले तरी वैचारिक स्तरावर त्यांची कामगिरी तितकीशी चांगली नाही. ही कमतरता दूर करण्यासाठी राहुल गांधी यांनी कंबर कसली आहे. विचारशील काँग्रेस कार्यकर्ते व युवा नेते घडविण्यासाठी येत्या ११ जून ते ६ जुलै या कालावधीत एनएसयूआयच्या वतीने चार आठवड्यांचा पब्लिक स्पीकिंग या विषयावरील अभ्यासवर्ग आयोजिण्यात आला आहे. त्यामध्ये ३० वर्षे वयाखालील कोणाही युवकाला प्रवेश दिला जाणार आहे. तो काँग्रेस पक्षाचा सदस्य असायलाच हवा अशी अट घालण्यात आलेली नाही. या अभ्यासवर्गामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाºयांना एनएसयूआयच्या वेबसाइटवर आपल्या नावाची नोंदणी करण्याची करता येईल. धोरणात्मक निर्णय तसे घेतले जातात, देशासमोरील समस्या काय आहेत व त्या कशा सोडविता येऊ शकतात याची माहिती पब्लिक स्पिकिंग कोर्समध्ये देण्यात येईल. प्रत्येक धोरणाच्या मागील राजकारण काय असते अशा अनेक बाबींची ओळख या अभ्यासवर्गामध्ये सहभागी होणाºया युवकांना करुन दिली जाईल़

टॅग्स :congressकाँग्रेस