शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरबीआयची मदत म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था संकटात - काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 08:19 IST

'सरकारकडून स्वत:ला प्रोत्साहन निधी देणे म्हणजेच अर्थव्यवस्था बिकट परस्थितीत असल्याचा हा पुरावा आहे.'

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला लाभांश व अतिरिक्त राखीव निधीपोटी 1.76 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. यावरुन काँग्रेसने केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून हा निधी घेणे म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिकट असल्याचे यावरुन स्पष्ट होते, असे काँग्रेसने म्हटले आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून घेणात येणाऱ्या निधीचा उपयोग कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे, याबाबत केंद्र सरकार काहीच खुलासा केला नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले. अभिषेक मनु सिंघवी यांनी ट्विट करुन सांगितले की,'सरकारकडून स्वत:ला प्रोत्साहन निधी देणे म्हणजेच अर्थव्यवस्था बिकट परस्थितीत असल्याचा हा पुरावा आहे. सरकार आपल्या स्वत:च्या एक युनिट म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या निधीवर अवलंबून आहे.' 

याचबरोबर, या निधीचा वापर कोणत्या योजनेसाठी केला जाणार आहे, याबाबत खुलासा करण्यात आली नाही. जर हा निधी प्राधान्य नसलेल्या क्षेत्रात किंवा प्रशासकीय खर्चासाठी होत असेल तर याचा आपल्या सर्वांना त्रास होईल, असे अभिषेक मनु सिंघवी म्हणाले. तसेच, हे सरकार स्वत: भारतीय रिझर्व्ह बँकेकडून निधी घेत आहे. तर आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या ऑटो, उत्पादन, लहान-मोठ्या उद्योग क्षेत्रासाठी काय निधी देणार, असा सवालही अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. 

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने पर्याप्त भांडवली निधीचे नवे सूत्र स्वीकारण्याचे ठरविले आहे. त्यानुसार पुरेशी भांडवली तरतूद करून शिल्लक राहणारा निधी केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 2018-19 या वर्षातील 1.76 कोटी रुपये केंद्राला दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे, डॉ. रघुराम राजन हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना यावरूनच सरकार व भारतीय रिझर्व्ह बँक यांच्यात तणातणी झाली होती. त्यानंतर सूत्र ठरविण्यास माजी गव्हर्नर डॉ. बिमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. समितीच्या शिफारशी स्वीकारण्याचा निर्णय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत झाला.

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक