महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा योग्यरित्या होत नसल्याचा आरोप राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं असून आता त्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी जनतेत भीतीचं वातावरण निर्माण करत असल्याचं म्हणत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ही बाब नाकारली होती. परंतु आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे महाराष्ट्राच्या समर्थनार्थ उतरले असून त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांवर टीका केली आहे. "केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना एका आरशासमोर उभं करून प्रश्न विचारला पाहिजे की काय केंद्रानं महाराष्ट्राला योग्य प्रमाणात लसींचा पुरवठा केला आहे का? लसीकरणाच्या मोहिमेत होत असलेल्या गडबडीचं जबाबदार केंद्र सरकार आहे. ज्यामध्ये लसींचा मुबलक प्रमाणात पुरवठा न होणंदेखील सामील आहे," असं चिदंबरम म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना निशाणा साधला.
Coronavirus : "केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना आरशासमोर उभं करून प्रश्न विचारा की, महाराष्ट्राला पुरेशा प्रमाणात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 11:57 IST
Coronavirus : राज्यात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र झाली बंद, केंद्राकडून लसींचा मुबलक पुरवठा होत नसल्याचा राज्य सरकारचा आरोप
Coronavirus : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना आरशासमोर उभं करून प्रश्न विचारा की, महाराष्ट्राला पुरेशा प्रमाणात...
ठळक मुद्देराज्यात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र झाली बंदकेंद्राकडून लसींचा मुबलक पुरवठा होत नसल्याचा राज्य सरकारचा आरोप