शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'काँग्रेस म्हणते, जेवढी लोकसंख्या तेवढा अधिकार...; मग हिंदूंनी त्यांचा अधिकार घ्यावा?' PM मोदींचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 17:35 IST

"देशाच्या साधनसंपत्तीवरील अधिकाराचा प्रश्न असेल, तर गरिबांचा पहिला अधिकार..."

बिहारमधील जातवार जनगणनेची आकडेवारी समोर आल्यानतंर संपूर्ण देशात राजकारण तापले आहे. देशातही जातवार जनगणना करण्यात यावी, अशी मागणीही सुरू झाली आहे. यातच, आता छत्तीसगडमधील बस्तर येथे एका सभेला संबोधित करताना  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, लोकसंख्येनुसार अधिकारांच्या मागणीवरून काँग्रेसवर थेट हल्ला चढवला. "मनमोहन जी तर म्हणत होते, देशातील साधनसंपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्यकांचा आहे आणि त्यातही पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. मग आता काँग्रेस अल्पसंख्याकांना धोका देऊ इच्छित आहे का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

मोदी म्हणाले "काँग्रेस म्हणत आहे की, ज्यांची जेवढी संख्या, त्यांना त्यानुसार अधिकार मिळावा. मग या देशात सर्वाधिक लोकसंख्या कुणाची आहे? आता काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, देशातील हिंदूंनी आपला अधिकार त्याच प्रमाणात घ्यावा का? या नुसार तर, देशातील साधन संपत्तीवर पहिला अधिकार देशातील हिंदूंचा आहे. हिंदूंमध्ये फूट पाडून देश बर्बाद करण्याची काँग्रेसची इच्छा आहे."

"गरीब जरी सामान्य श्रेणीतील असला तरी माझ्यासाठी गरीब सर्वांपेक्षा वरचा आहे. काँग्रेसला लोकांमध्ये फूट पाडायची आहे. काँग्रेसने केवळ गरिबी दिली आणि देशाचे तुकडे करण्याचे काम केले. देशातील हिंदूंमध्ये फूट पाडून काँग्रेसला देश उद्ध्वस्त करायचा आहे. काँग्रेसचे नेते आता काँग्रेस पक्ष चालवत नाहीत. अनुभवी नेत्यांचे मत विचारात घेतले जात नाही. देशविरोधी शक्तींशी हातमिळवणी करणारे लोक काँग्रेस चालवत आहेत आणि लोकांच्या भावनांशी खेळत आहेत," असा आरोपही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला.

"काँग्रेसने आजपर्यंत दुसऱ्या देशासोबत कोणता गुप्त करार केला आहे हे उघड केलेले नाही, पण देश पाहतोय की या करारानंतर काँग्रेसने देशावर आणखी टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना भारतातील कोणत्याच गोष्टी आवडत नाहीत, असे दिसते. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या या नव्या षडयंत्रापासून लोकांनी सावध राहायला हवे. देशाच्या साधनसंपत्तीवरील अधिकाराचा प्रश्न असेल, तर गरिबांचा पहिला अधिकार आहे," असे मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीChhattisgarhछत्तीसगडcongressकाँग्रेसHinduहिंदूMuslimमुस्लीमPoliticsराजकारण