शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गळाभेटीची ट्वविटरवर काँग्रेसकडून खिल्ली, भाजपाकडून संपप्त प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2018 20:27 IST

भारत दौऱ्यावर आलेले इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे दिल्लीत आगमन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजशिष्टाचार मोडून गळाभेट घेत स्वागत केले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या गळाभेटीच्या रणनीतीची काँग्रेसने खिल्ली उडवली आहे.

नवी दिल्ली - भारत दौऱ्यावर आलेले इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे दिल्लीत आगमन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजशिष्टाचार मोडून स्वागत केले. या स्वागत सोहळ्यादरम्यान मोदी आणि नेतान्याहू यांनी एकमेकांची गळाभेटही घेतली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या गळाभेटीच्या रणनीतीची काँग्रेसने खिल्ली उडवली आहे. मोदींच्या या गळाभेटीची खिल्ली उडवणारा व्हिडिओ काँग्रेसने शेअर केला आहे. दरम्यान, भाजपाने काँग्रेसच्या या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया दिली असून, काँग्रेसची ही कृती म्हणजे आपल्या देशात आलेल्या पाहुण्यांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.  काँग्रेस पक्षाच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हि़डिओ ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विविध राष्ट्रांच्या प्रमुखांची गळाभेट घेण्याच्या सवयीवर टीका करण्यात आली आहे.  मोदींची गळाभेट घेण्याची सवय म्हणजे जरा जास्तच असल्याचे सांगत त्यांचे विविध राष्ट्रांच्या प्रमुखांबरोबरचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. मात्र काँग्रेसकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमुळे भाजपाचा तीळपापड झाला आहे. मोदींच्या जगभरातील वाढत्या लोकप्रियतेमुळे काँग्रेस सैरभैर झाली आहे. त्यामुळेच काँग्रेसकडून असे कृत्य करण्यात आले. असे प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

  इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू  रविवारी भारतात दाखल झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रोटोकॉल तोडत त्यांचं विमानतळावर स्वागत केले. नेतान्याहू यांची पत्नी साराही भारताच्या दौ-यावर आली आहे. इस्रायलच्या पंतप्रधानांनी 14 वर्षांनंतर भारत दौरा केला आहे. नेतान्याहू हे नवी दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी तीन मूर्ती चौकाला भेट दिली आणि त्यांनी हायफाच्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यामुळे आता तीन मूर्ती चौकाचं नाव बदलून तीन मूर्ती हायफा चौक ठेवण्यात येणार आहे.नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नीशी हस्तांदोलन केलं. यापूर्वी 2003मध्ये इस्रायलचे माजी पंतप्रधान एरियल शेरोन भारताच्या दौ-यावर आले होते. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदीही इस्रायलला गेले होते. त्यानंतर आता बेंजामिन नेतान्याहू भारताच्या दौ-यावर आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस