शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

चीन मुद्यावरून काँग्रेस जाब विचारणार, सीमांचे रक्षण करण्यात अपयश आल्याचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 03:00 IST

चीनच्या मुद्यावरून सरकार आणि काँग्रेस यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही विरोधी पक्षांना सोबत घेऊन देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सगळ्या प्रश्नांना उपस्थित करू

शीलेश शर्मानवी दिल्ली : चीनच्या मुद्यावरून सरकार आणि काँग्रेस यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही विरोधी पक्षांना सोबत घेऊन देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सगळ्या प्रश्नांना उपस्थित करू. त्यात चीनचाही मुद्दा असेल, असे संकेत काँग्रेसने दिले आहेत.

पक्षाचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी आरोप केला, की मोदी सरकार देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी या आरोपाला उत्तर देताना काँग्रेस पक्ष लष्कराच्या मुद्यावर जे राजकारण करीत आहे त्यात देशहित नाही, असे म्हटले. काँग्रेसचा आरोप होता, की चीनने डोकलाम पठारावर कब्जा केला आहे व त्यामुळे उत्तरपूर्वेसाठी धोका निर्माण झाला आहे. उपग्रहाने जी छायाचित्रे पाठवली आहेत त्यातून हे स्पष्ट दिसते, की देशाच्या सीमांवर संकट उभे ठाकले आहे; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज वस्तुस्थितीला तोंड न देता देशाची दिशाभूल करीत आहेत.

उपग्रहाने जी छायाचित्रे पाठवली व प्रसारमाध्यमातून जे येत आहे त्यातून चीनने डोकलाम पठारावर कब्जा केल्याचे दिसते. चीनने त्या पठारावर हेलिपॅडही तयार केले आहे व त्याच्या कारवाया (बंकर बनवणे, वाहनांची ये-जा) वेगाने सुरू आहेत, असे काँग्रेसने म्हटले.भारतीय लष्करापासून काहीच मीटर अंतरावर चीनने बनवलेला निरीक्षण मनोरा हेच सांगतो, की चीनचे सैन्य आमच्या सैन्यावर लक्ष ठेवून आहे. अशा अनेक गोष्टी आहेत व त्याची सगळी माहिती सरकारकडे आहे; परंतु सरकार ती लपवत आहे. देशाच्या सुरक्षिततेला धोका आहे, असे काँग्रेसला वाटते. सामरिक हितासाठी चर्चेची प्रक्रिया सुरू ठेवली जावी व मुत्सद्देगिरीतून प्रश्न सोडवले जावेत; परंतु सरकार अशी काहीही उपाययोजना करीत नाही, असे सुरजेवाला म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेस