शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस ‘वंचित’शी आघाडीच्या तयारीत; राहुल गांधी यांचे राज्यातील नेत्यांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 06:05 IST

राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांची दोन सत्रांत चर्चा केली.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवनानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीशी समझोता करण्याचा आग्रह धरला आहे. येत्या ३ जुलैपासून माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील ‘वंचित’च्या नेत्यांशी जागावाटपाची चर्चा करतील. समाधानकारक प्रस्ताव देऊ न आघाडी करा, असे निर्देश राहुल गांधी यांनी दिले आहेत.

राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांची दोन सत्रांत चर्चा केली. या बैठकीस विजय वडेट्टीवार, शरद रणपिसे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, हुसेन दलवाई आदी नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’मुळे काँग्रेसला मोठा फटका बसला. मुस्लीम व दलित मतदार पक्षापासून दुरावला, असे विश्लेषण स्थानिक नेत्यांनी राहुल गांधी यांच्यासमोर केले.

वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतल्यास काँग्रेसच्या इतर सहकारी पक्षांना नेमक्या किती जागा देणार, हा प्रश्न मात्र आजच्या या बैठकीनंतरही अनुत्तरित राहिला. स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (कवाडे व गवई गट) आदी पक्षांनाया जागावाटपात ‘वंचित’ राहण्याची शक्यता असल्याने त्यांचीही नाराजी दूर करावी लागेल, अशी भीती एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केली. राज्यातील नेतृत्वबदलावर बैठकीत चर्चा झाली नसल्याचा दावा सूत्रांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी