शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Rahul Gandhi : "मोदीजी पुन्हा माफी मागण्याची वेळ आलीय पण याआधी आरोपीच्या वडिलांना मंत्री पदावरून हटवा" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 16:30 IST

Congress Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

नवी दिल्ली - लखीमपूर खेरीमध्ये (Lakhimpur Kheri Case) शेतकऱ्यांवर गाडी चढवणे, हा पूर्वनियोजित कटाचा भाग होता. विशेष तपास पथकाने (SIT) ही माहिती दिली आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा मुख्य आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस पथकाने आशिष मिश्रा यांच्यावरील आरोपांमध्ये सुधारणा करण्यात यावी, असे पत्र न्यायाधीशांना लिहिले आहे. आशिष मिश्रा आणि इतरांवर यापूर्वीच खून आणि कट रचण्याचे आरोप आहेत. त्यात खुनाचा प्रयत्न आणि इतर आरोपही जोडले जावेत, अशी विशेष तपास पथकाची इच्छा आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"पुन्हा एकदा माफी मागण्याची वेळ आली आहे" असं म्हणत राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला आहे. तसेच माफी मागण्याआधी शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या आरोपीच्या वडिलांना मंत्रीपदावरून हटवा अशी मागणी देखील केली आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मोदीजी पुन्हा एकदा माफी मागण्याची वेळ आली आहे. पण याआधी आरोपीच्या वडिलांना मंत्री पदावरून हटवा. आता सत्य सर्वांसमोर आलं आहे" असं म्हटलं आहे. तसेच Lakhimpur आणि Murder हे दोन हॅशटॅग देखील राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये वापरले आहेत. 

सत्ताधारी भाजपा यूपीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असताना, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यासाठी या घडामोडी मोठी डोकेदुखी ठरू शकतात. या घटनेनंतर विरोधकांकडून अजय मिश्रा यांना हटवण्याची मागणी सातत्याने होत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवले आहे. लखीमपूर खेरीच्या घटनेबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून, त्याचा परिणाम येत्या निवडणुकीत दिसून येऊ शकतो.

त्या दिवशी काय घडले ?

3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या या घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. आशिष मिश्रा यांच्या एसयूव्हीने शेतकर्‍यांना चिरडले होते, या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतर हिंसाचार उसळला आणि आणखी चार जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आशिष मिश्राचे नाव आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रासह 14 आरोपींविरुद्ध कलम 279, 338, 304अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर एसआयटीने हा सुनियोजित कट असल्याचे म्हटले आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारPoliticsराजकारण