शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

Rahul Gandhi : "चीनने आपली जमीन हडपली हे संपूर्ण लडाखला माहितीय पण मोदी..."; राहुल गांधींचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 11:11 IST

Congress Rahul Gandhi Slams Narendra Modi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यावर आता प्रतिक्रिया दिली आहे.

चीनने सोमवारी आपला अधिकृत नकाशा प्रसिद्ध केला असून, यामध्ये भारताचा अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन, तैवान आणि वादग्रस्त दक्षिण चीन समुद्र आपल्या हद्दीत दाखवला आहे. ‘ग्लोबल टाइम्स’ या चीनच्या अधिकृत वृत्तपत्राने एक्स सोशल मीडियावर दुपारी ३:४७  वाजता नवीन नकाशा पोस्ट केला. चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाच्या नकाशा सेवेच्या वेबसाइटवर एक नवीन नकाशादेखील लाँच करण्यात आला आहे. चीन आणि जगातील विविध देशांच्या सीमा रेखाटण्याच्या पद्धतीच्या आधारे हा नकाशा तयार करण्यात आला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. "चीनने आपली जमीन हडपली हे संपूर्ण लडाखला माहितीय" असं म्हणत नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "लडाखमध्ये एक इंचही जमीन गेली नाही, असं पंतप्रधान म्हणाले, ते खोटं आहे, हे मी अनेक वर्षांपासून म्हणत आहे. चीनने अतिक्रमण केलं आहे आणि हे संपूर्ण लडाखला माहीत आहे. नकाशाचा हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. त्यांनी जमीन हिसकावून घेतली आहे. यावर पंतप्रधानांनी काही तरी बोलायला हवं" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

राहुल गांधी यांनी य़ाआधी देखील लडाखमध्ये मोठं विधान केलं होतं. "लडाखच्या लोकांनी मला सांगितलं आहे की, चिनी सैन्य येथे घुसलं आहे. त्यांना जी पूर्वी त्यांची ग्रेजिंग लँड होती तिथे जाता येत नाही  लडाखमध्ये प्रत्येकजण हेच म्हणत आहे. एक इंचही जमीन गेली नाही असे पंतप्रधान म्हणाले आहेत, पण ते खरं नाही. तुम्ही इथे कोणालाही विचारा, तो तुम्हाला सांगेल" असं म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला होता. 

राहुल गांधी यांनी "लडाखच्या लोकांच्या अनेक तक्रारी आहेत, त्यांना जो दर्जा देण्यात आला आहे त्यावर ते खूश नाहीत. त्यांना प्रतिनिधित्व हवे आहे आणि बेरोजगारीची समस्या आहे. नोकरशाहीने नव्हे तर जनतेच्या आवाजाने राज्य चालवले पाहिजे, असे लोक म्हणत आहेत" असं म्हटलं होतं. तसेच राहुल यांनी लडाख गाठून युवा काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती. काही राजकीय लोक देशात द्वेषाचे वातावरण निर्माण करत आहेत. तुम्ही भारतात गेलात, लोकांमध्ये जा, तुम्हाला दिसेल की लोकांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहे असं राहुल गांधी म्हणाले होते.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन