शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: “भाजप नेते घाबरट, जम्मूत यात्रा काढू शकत नाहीत”; भर बर्फवृष्टीत राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 14:45 IST

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेदरम्यान भर बर्फवृष्टीत जनतेला संबोधित करताना राहुल गांधींनी भाजप आणि मोदी सरकारवर टीका केली.

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा १४५ दिवस, १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर येथे पोहोचली आहे. याच ठिकाणी आता भारत जोडो यात्रेची सांगता होत आहे. यावेळी भर बर्फवृष्टी सुरू असताना राहुल गांधी यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचा कोणताही नेता माझ्यासारखा चार दिवस पायी प्रवास करू शकत नाही.  जम्मू-काश्मीरचे लोक त्यांना फिरू देणार नाहीत, असे नाही. तर, भाजपचे लोक घाबरट आहेत, या शब्दांत राहुल गांधी यांनी निशाणा साधला. 

जर तुम्हाला जगायचे असेल तर तुम्हाला न घाबरता जगायला हवे, हे मी महात्मा गांधीजींकडून शिकलो. मी चार दिवस इथे फिरलो. जम्मू-काश्मीरच्या लोकांनी मला हँड ग्रेनेड दिले नाही, तर खूप प्रेम दिले. अगदी कौतुकाने माझे स्वागत केले, असे राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच मला वाटले की, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सुरू केलेला पायी प्रवास कठीण नसेल. मात्र, कन्याकुमारी येथून सुरुवात केल्यावर लगेचच माझा गुडघा दुखायला लागला. मात्र, काश्मीरला येईपर्यंत ते दुःख दूर झाले, असे राहुल गांधी म्हणाले. 

ही काश्मिरियत आहे का? राहुल गांधींचा थेट सवाल

मी सरकारी घरात राहिलो आहे. कारण माझ्याकडे कधीच घर नव्हते. माझ्यासाठी घर ही संरचना नाही, तर ती जीवन जगण्याची पद्धत आहे. ज्याला तुम्ही काश्मिरियत म्हणता, मी ते घर मानतो. ही काश्मिरियत आहे का? अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली. या पृथ्वीवर दोन विचारधारा आहेत, त्यांच्यात वर्षानुवर्षे नाते आहे. त्याला आपण काश्मिरियत म्हणतो, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच महादेव शिवशंकरांची विचारसरणी आणि इस्लाममधील विचारसरणी कशी सारखी आहे, याचे उदाहरणही दिले. 

पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांना हिंसेची वेदना समजू शकत नाही

जे लोक हिंसा घडवून आणतात, त्यांना याचे दुःख कधीही समजणार नाही. मात्र, या हिंसेची वेदना मी समजू शकतो. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांचे काय झाले हे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना समजू शकत नाही. मी समजू शकतो. जेव्हा मी अमेरिकेत होते, तेव्हा मला एक फोन आला आणि त्यांनी सांगितले की, माझ्या वडिलांची हत्या करण्यात आली आहे, अशी आठवण सांगत, असे फोन जवानांच्या घरी येणे बंद झाले पाहिजे, अशी माझी इच्छा आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीर