शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींना मागच्या रांगेत बसवलं; काँग्रेसने व्यक्त केला संताप, सरकारने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 16:22 IST

Congress Rahul Gandhi : स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात राहुल गांधी ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंसोबत चौथ्या रांगेत बसलेले दिसले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून सलग अकराव्यांदा देशाला संबोधित केलं. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात राहुल गांधी ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंसोबत चौथ्या रांगेत बसलेले दिसले. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली आहे. काँग्रेसने यावरून संताप व्यक्त केला आहे. 

ऑलिम्पिक पदक विजेते राहुल गांधींच्या पुढे बसलेले दिसतात. ते ज्या रांगेत बसले आहेत, तिथे त्यांच्यासोबत हॉकी टीमचे काही खेळाडूही बसले आहेत. राहुल यांच्या मागे आणखी काही पाहुणे बसले आहेत. दहा वर्षात पहिल्यांदाच विरोधी पक्षाचे नेते लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला उपस्थित होते. अशा स्थितीत त्यांना पाठीमागे बसवण्यावरून वाद निर्माण झाला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर सरकारने प्रतिक्रिया दिली आहे. 

राहुल गांधींना पाठीमागे बसवल्यामुळे काँग्रेसने यावरून राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार विवेक तन्खा म्हणाले की, "संरक्षण मंत्रालय इतकं वाईट का वागत आहे? लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना चौथ्या रांगेत बसवलं. विरोधी पक्षनेतेपद मोठं आहे. लोकसभेत ते पंतप्रधानांच्या नंतर येतं. तुम्ही संरक्षण मंत्रालयाला राष्ट्रीय कार्यक्रमाचे राजकारण करण्याची परवानगी कशी देऊ शकता?"

राहुल गांधी यांच्या बसण्यावरून होत असलेल्या राजकारणावरही सरकारकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, यावेळी पुढची रांग ऑलिम्पिक पदक विजेत्यांसाठी अलॉट करावी लागली. त्यामुळे राहुल गांधींना मागच्या रांगेत बसावं लागलं. स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रमाचं आयोजन करणं आणि बसण्याची योजना करं  ही संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी असते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी काही केंद्रीय मंत्र्यांनाही मागे बसावं लागलं आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसIndependence Dayस्वातंत्र्य दिन