शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

“इलेक्टोरल बॉण्डमधून बळजबरीने वसुली, पंतप्रधान मोदी मास्टरमाइंड”; राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 12:05 IST

Rahul Gandhi News: एक दिवस सीबीआयचा तपासाला सुरुवात करते. त्यानंतर त्यांना पैसे मिळतात आणि लगेचच तपास संपतो, हे कसे ते पंतप्रधानांनी स्पष्ट करावे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.

Rahul Gandhi News: इलेक्टोरल बॉण्डमधील सर्वांत महत्त्वाची गोष्टी म्हणजे नाव आणि तारीख आहे. जर तुम्ही नाव आणि तारीख पडताळून पाहिली, तर तुम्हाला कळेल की, मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यावर किंवा छापेमारी झाल्यावर लगेचच लोकांनी इलेक्टोरल बॉण्डमध्ये पैसे दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पकडले गेले आहेत, अशी टीका काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केली.

निवडणूक रोखे योजना रद्द झाल्यामुळे देश पुन्हा काळ्या पैशाकडे ढकलला गेला आहे. प्रामाणिकपणे विचार केल्यास त्याचा प्रत्येकाला पश्चात्ताप होईल. गुन्हेगारी कारवायांतील  काळा पैसा तसेच अन्य स्रोतांतून आलेली बेहिशेबी रक्कम निवडणुका लढविण्यासाठी वापरली जात होती. ते रोखण्यासाठी निवडणूक रोख्यांची योजना सरकारने लागू केली होती. अर्थात ही योजना उत्तम पर्याय होता, असे आम्ही कधीही म्हटले नाही. मात्र, विरोधकांनी त्याबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरविली, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत केले. यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

मास्टरमाइंड पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत

निवडणूक रोखे म्हणजेच इलेक्टोरल बॉण्ड जगातील सर्वांत मोठी रिकव्हरी स्कीम आहे. इलेक्टोरल बॉण्डमधून होत असलेल्या वसुलीचे मास्टरमाइंड पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. पंतप्रधानांनी स्पष्ट केले पाहिजे की, एक दिवस सीबीआयचा तपास सुरू होतो आणि त्यानंतर त्यांना पैसे मिळतात. लगेचच सीबीआयचा तपास संपतो. ही पिळवणूक आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

दरम्यान, भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात गरिबांसाठी काहीही नाही. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अन्य सर्व राष्ट्र विचार चिरडायचे आहेत. त्यामुळेच त्यांना राज्यघटना व लोकशाही प्रक्रिया नको आहे, असा आरोप राहुल गांधींनी वायनाड येथे केला. केरळचा राज्यकारभार नागपुरातून का चालवला जावा, केरळचा राज्यकारभार स्थानिक शहरे आणि खेड्यांद्वारे चालवला गेला पाहिजे. केरळमधील शाळा कशी असावी तसेच तेथील जनतेला काय हवे आहे, हे दिल्लीला कसे कळेल,  असा सवालही त्यांनी केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीelectoral bondsइलेक्टोरल बॉन्डNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार