काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत 'H फाइल्स' नावाने एक प्रेझेंटेशन दिलं आहे. याद्वारे त्यांनी पुन्हा एकदा मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला. हरियाणात काहीतरी गडबड असल्याच्या असंख्य तक्रारी आल्या. आम्हाला मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातही असाच अनुभव आला. अनेक राज्यांमधून मतचोरीच्या तक्रारी मिळाल्या असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
"हरियाणात आम्हाला आमच्या उमेदवारांकडून तक्रारी मिळाल्या. सर्व भाकितं पलटली. काय घडलं याची आम्ही चौकशी केली. पाच प्रमुख एक्झिट पोलमध्ये हरियाणात काँग्रेसच्या विजयाचं भाकित करण्यात आलं होतं. हरियाणात पहिल्यांदाच पोस्टल बॅलेट प्रत्यक्ष निकालापेक्षा वेगळं होतं. हरियाणात एका तरुणीने वेगवेगळ्या नावांनी २२ वेळा मतदान केलं."
"तरुणीने कधी सीमा, कधी स्वीटी आणि कधी सरस्वती म्हणून मतदान केलं आहे" असं म्हणत राहुल गांधींनी "बनावट मतदान" करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मुलीचा फोटोही प्रसिद्ध केला. त्यांनी सांगितलं की, हा फोटो देखील बनावट आहे कारण तो एका ब्राझिलियन मॉडेलचा आहे. हरियाणाच्या राय विधानसभा मतदारसंघात एका तरुणीने २२ वेळा मत दिलं. प्रत्येक मत वेगवेगळ्या नावाने होतं आणि १० मतदान केंद्रांवर नोंदणी केलेली होती. धक्कादायक बाब म्हणजे, ही महिला ब्राझिलियन मॉडेल मॅथ्यूस फेरेरो आहे.
राहुल गांधी म्हणाले की, हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव फक्त २२,७८९ मतांनी झाला, ज्यामुळे निवडणूक किती अटीतटीची होती हे दिसून येतं. हरियाणात पहिल्यांदाच पोस्टल बॅलेट प्रत्यक्ष निकालापेक्षा वेगळं होतं. यापूर्वी पाच प्रमुख एक्झिट पोलमध्ये हरियाणात काँग्रेसच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत मोठा कट रचल्याचा आरोप करत राहुल गांधींनी दावा केला की, "आमच्या उमेदवारांनी तक्रारी केल्या. सर्व भाकितं उलथून टाकण्यात आली. तपासात एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे. काँग्रेसच्या मोठ्या विजयाला पराभवात बदलण्यासाठी कट रचण्यात आला होता. हरियाणात २५ लाख मतं चोरीला गेली आणि ५.२१ लाख डुप्लिकेट मतदार होते."
"हरियाणामध्ये एकूण २ कोटी मतदार आहेत आणि त्यामुळे मतचोरीचं प्रमाण १२% आहे, म्हणजेच दर आठ मतदारांपैकी एक बनावट आहे." राहुल गांधी यांनी याला तरुण पिढीच्या भविष्याची चोरी असं वर्णन केलं. त्यांनी नायब सिंग सैनी यांच्या एका व्हिडिओचाही उल्लेख केला, ज्यामध्ये ते असे म्हणताना ऐकू येतं की, "आमच्याकडे सर्व व्यवस्था आहे. आम्ही जिंकत आहोत. भाजपा एकहाती सरकार स्थापन करत आहे." राहुल यांनी हा व्हिडीओ एका कटाचा भाग असल्याचं म्हटलं.
Web Summary : Rahul Gandhi alleges voter fraud in Haryana, citing a woman casting 22 votes under different names. He claims widespread irregularities, including fake voters, impacting election results.
Web Summary : राहुल गांधी ने हरियाणा में मतदाता धोखाधड़ी का आरोप लगाया, जिसमें एक महिला ने अलग-अलग नामों से 22 वोट डाले। उन्होंने फर्जी मतदाताओं सहित व्यापक अनियमितताओं का दावा किया, जिससे चुनाव परिणाम प्रभावित हुए।