शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 15:56 IST

Congress Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वतः तलावात उडी मारली आणि स्थानिक मच्छिमारांसोबत पारंपारिक मासेमारी प्रक्रियेत भाग घेतला.

२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना राजकीय पक्ष प्रचारात सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. शनिवारी बेगुसरायमध्ये एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वतः तलावात उडी मारली आणि स्थानिक मच्छिमारांसोबत पारंपारिक मासेमारी प्रक्रियेत भाग घेतला.

राहुल गांधींच्या या कृतीने उपस्थित गावकऱ्यांमध्ये उत्साहाची लाट पसरली, त्यांना फार आनंद झाला. लोकांनी राहुल गांधींना तलावात उडी मारताना, जाळं टाकताना आणि मासे पकडताना पाहिलं. या दृश्याने सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळपासूनच तलावात तयारी सुरू होती. राहुल गांधी आल्यावर गावकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने त्यांचं स्वागत केलं. कोणताही संकोच न करता त्यांनी तलावात उडी मारली आणि मच्छिमारांसोबत जाळं टाकलं. तलावाजवळ उपस्थित असलेले लोक म्हणाले, "आम्ही यापूर्वी कधीही असं दृश्य पाहिलं नव्हतं. आमच्या परंपरांना स्वीकारत एक प्रमुख नेता अशा प्रकारे आमच्यात आला आहे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे."

राहुल गांधींसोबत यावेळी व्हीआयपी प्रमुख मुकेश सहनी आणि काँग्रेस नेते कन्हैया कुमार देखील उपस्थित होते. तिन्ही नेते एकत्र तलावात उतरले, गावकऱ्यांशी संवाद साधला आणि स्थानिक जेवणाचा आस्वाद घेतला. सहनी म्हणाले, "हा केवळ एक उपक्रम नाही तर बिहारच्या मातीशी जोडलं जाण्याचा संदेश आहे."

राहुल गांधी तलावात उतरल्याच्या व्हिडीओला काही तासांतच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांनी व्हिडीओ शेअर करत त्यांना "खरा लोकनेता" असं म्हटलं आहे. काँग्रेस नेते म्हणतात, "राहुल गांधी केवळ भाषणांद्वारेच नव्हे तर ग्राऊंड लेव्हलवर येऊन जनतेशी जोडले जात आहेत." राजकीय तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, राहुल गांधींचा दौरा बिहार निवडणुकीच्या संदर्भात एक महत्त्वाचा प्रतीकात्मक मेसेज देत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi Jumps in Lake to Catch Fish; Video Viral

Web Summary : Ahead of Bihar elections, Rahul Gandhi surprised villagers in Begusarai by jumping into a lake to fish with them. The act, alongside VIP chief Mukesh Sahani and Congress leader Kanhaiya Kumar, was widely viewed and praised as a gesture connecting with the people.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसfishermanमच्छीमारBiharबिहारElectionनिवडणूक 2024Politicsराजकारण