शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Priyanka Gandhi : "भाजपाच्या 20 वर्षांच्या कारभारात महिला सुरक्षित नाहीत"; प्रियंका गांधींनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 16:54 IST

Congress Priyanka Gandhi : एका मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेवरून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी गुरुवारी राज्यातील भाजपा सरकारवर निशाणा साधला.

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे एका मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेवरून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी गुरुवारी राज्यातील भाजपा सरकारवर जोरदार निशाणा साधला. भाजपाच्या 20 वर्षांच्या कारभारात मुली, महिला, आदिवासी सुरक्षित नसल्याचा आरोप त्यांनी केला. उज्जैन शहरातील रस्त्यावर रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत 12 वर्षांची मुलगी सोमवारी आढळली. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याची पुष्टी झाली आहे.

प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. "भगवान महाकाल यांच्या उज्जैन नगरीमध्ये एका लहान मुलीवर झालेला क्रूरपणा मन हेलावून टाकणारा आहे. अत्याचारानंतर ती अडीच तास मदतीसाठी दारदारी भटकत राहिली आणि नंतर रस्त्यावर बेशुद्ध पडली मात्र मदत मिळू शकली नाही."

"ही मध्य प्रदेशची कायदा आणि सुव्यवस्था आणि महिलांची सुरक्षा? भाजपाच्या 20 वर्षांच्या कारभारात भारतातील महिला, आदिवासी आणि दलित सुरक्षित नाहीत. महिलांना संरक्षण आणि मदत मिळत नसेल, तर बहिणीच्या नावावर निवडणुकांमध्ये घोषणा जाहीर करून काय उपयोग?" असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. 

राहुल गांधी यांनी देखील उज्जैन घटनेबाबत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर निशाणा साधला आहे. उज्जैन शहरात बलात्कार झालेल्या 12 वर्षीय मुलीवर इंदूरच्या सरकारी रुग्णालयात बुधवारी तज्ज्ञ डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. मात्र त्यानंतरही तिची प्रकृती चिंताजनक आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीला उज्जैन येथून गंभीर अवस्थेत मंगळवारी इंदूरच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. 

 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस