शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पर्याय नसताना मैदान सोडणे योग्य नाही; शरद पवारांनी राहुल गांधीचे कान टोचले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 18:18 IST

'काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही.'

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी भेट घेतली. या भेटीदरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण करण्याबाबत चर्चा करण्यात आली की काय? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, शरद पवार यांनी यावर खुलासा केला असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले.

आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आहे का? तुम्हाला राज्यसभेत विरोधीपक्षनेतेपदाची ऑफर आहे का? या प्रश्नावर काँग्रेसला नेतृत्वाची कमतरता असल्यामुळे कदाचित त्यांना वाटत असावे, असे उत्तर शरद पवार यांनी यावेळी दिले. तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात जे झाले, त्याची तपशीलवार माहिती घेतली. याशिवाय, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे त्यासंदर्भात चर्चा झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले. 

 

याचबरोबर, समोर पर्याय दिसत नसताना मैदान सोडणे योग्य नाही, असे मत शरद पवार यांनी राहुल गांधी यांनी दिलेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर व्यक्त केले आहे. आपण असे अनेक पराभव पाहिलेले आहेत. यातून सावरण्यासाठी संघर्ष करण्याची गरज आहे. तो नक्कीच करता येईल, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRahul Gandhiराहुल गांधी