शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'संविधान बचाव रॅली'चं ट्विट करताना चुकले राहुल गांधी, करावं लागलं डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 09:17 IST

रॅलीविषयी लोकांना माहिती देताना राहुल गांधींकडून चूक झाली.

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी (23 एप्रिल) रोजी दिल्लीतील तालकटोरा स्टेडिअममध्ये 'संविधान बचाव रॅली'ला संबोधित केलं. या रॅलीविषयी लोकांना माहिती देताना राहुल गांधींकडून चूक झाली.  'संविधान बचाव रॅली' विषयी ट्विट करून लोकांना माहिती देताना राहुल गांधी यांनी चुकीने 'संसद घेराव रॅली' असं ट्विट केलं. ट्विट करताना झालेली चूक लक्षात येताच राहुल गांधी यांनी काही वेळात ते ट्विट डिलीट केलं. व त्यानंतर  'संविधान बचाव रॅली'चं दुसरं ट्विट केलं. 

भले देश होरपळू दे, मुलींवर बलात्कार होऊदेत, दलित व अल्पसंख्याकांच्या हक्कांवर गदा येत असेल पण नरेंद्र मोदी यांचे सारे लक्ष पुन्हा पंतप्रधान बनण्याकडेच लागलेलं आहे, अशा बोचऱ्या शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली आहे. राज्यघटनेतील मूल्यांना मोदी सरकारच्या कारकीर्दीत धोका निर्माण झाला आहे. मात्र या मूल्यांच्या रक्षणासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे. मोदी सरकार सर्वोच्च न्यायालयाची गळचेपी करत असून संसदेतील कामकाजही बंद पाडले आहे, असंही ते म्हणाले. 

देशातील विविध यंत्रणांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोकांचा भरणा केला जात आहे असा आरोप करून ते पुढे म्हणाले की, दलितांनी केलेल्या स्वच्छताकार्यामध्ये पंतप्रधानांना आध्यात्मिकतेचे दर्शन झाले. मात्र दलित, तसेच समाजातील दुर्बल घटक, महिला यांच्याविषयी पंतप्रधानांच्या मनात अजिबात कणव नसल्याचे देशाने पाहिले आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस