शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या हृदयात दलितांसाठी जागा नाही- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 15:07 IST

राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना कर्मयोगी- नरेंद्र मोदी असं संबोधलं.

नवी दिल्ली- काँग्रेस पक्षानं आज संविधान बचाओ रॅलीचं आयोजन केलं होतं. ज्याचा उद्देश संविधान आणि दलितांवरच्या कथित हल्ल्याच्या मुद्द्यांवर राष्ट्रीय पातळीवर आवाज उठवणं असेल. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना कर्मयोगी- नरेंद्र मोदी असं संबोधलं. जो शौचालय साफ करतो तो घाणही उचलतो. हे काम वाल्मिकी समाज कित्येक वर्षांपासून करतोय. वाल्मिकी समाजाच्या व्यक्तीला स्वतःचं पोट भरण्यासाठी हे काम करावं लागतं. परंतु पंतप्रधानांनी वाल्मिकी समाज अध्यात्मासाठी हे काम करत असल्याचं सांगितलं, असं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला. देशात दलितांवरचा अत्याचार वाढत आहे. मोदींच्या हृदयात दलितांसाठी कोणतीही जागा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींची विचारधारा दलितांशी मिळतीजुळती नाही.दलितांवर अत्याचार वाढत असतानाही मोदी शांत आहेत. यूपी, उन्नाव सारखी प्रकरणं समोर येत आहेत. काँग्रेसनं गुजरातमध्ये आवाज उठवल्यानंतर तीन दिवसांनंतर स्टेजवर मोदी आले आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू निघाले. देशाच्या संविधानाचा आवाज दाबण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायमूर्ती जनतेसमोर न्यायाची मागणी करत आहेत. मी जर राफेल आणि नीरव मोदीच्या मुद्द्यावर संसदेत 15 मिनिटे बोललो तरी नरेंद्र मोदी माझ्यासमोर उभे राहू शकत नाही. लोकसभा निवडणूक 2019च्या पार्श्वभूमीवर दलित समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असून हे अभियान महत्त्वपूर्ण मानले जात आहे. या राष्ट्रव्यापी अभियानाची सुरुवात आजपासून राजधानी नवी दिल्लीतील तालकटोर स्टेडिअममधून झाली आहे. या अभियानात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासहीत काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे आणि सुशीलकुमार शिंदेदेखील सहभागी झाले होते.  वर्षभर सुरू राहणार 'संविधान बचाओ' अभियानकाँग्रेसचे 'संविधान बचाओ' अभियान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत (14 एप्रिल 2019) सुरू राहणार आहे. या अभियानासंदर्भात बोलताना एका काँग्रेस नेत्यानं सांगितले की, भाजपा सरकारच्या कार्यकाळात संविधान धोक्यात आले आहे. दलित समाजाला शिक्षण आणि रोजगाराची संधी मिळत नाहीय. हे मुद्दा राष्ट्रीय स्तरावर मांडणे, हा 'संविधान बचाओ' अभियानाचा उद्देश आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी